Prabhsimran Singh 7 consecutive fours 
Sports

४,४,४,४,४,४,४... छा गया पंजाब दा मुंडा... लागोपाठ ७ चौकार लगावले

Prabhsimran Singh 7 consecutive fours : प्रभसिमरन सिंगने आयपीएल 2026 मध्ये सलग 7 चौकार मारत इतिहास रचला.

Namdeo Kumbhar

दिल्लीच्या मैदानावर पंजाबच्या सलामीच्या जोडीने वादळी फलंदाजी केली. प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या यांच्या वादळा दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. दोघांनी ६.५ षटकात १२६ धावांचा पाऊस पाडला. दिल्लीने दिलेल्या २६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने विस्फोटक सुरूवात केली. प्रियांश आर्याने १७ चेंडूत २५२ च्या स्ट्राईक रेटने ४३ धावांचा पाऊस पाडला. त्याने ५ षटकार आणि २ चौकार ठोकले. या सामन्यात प्रभसिमरन याने लागोपाठ ७ चौकार मारत अनोखा विक्रम नावावर केला.

प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या फलंदाजी करत होते, त्यावेळी क्रिकेट की व्हिडिओ गेम पाहत असल्याचा फील येत होता. पावरप्लेच्या अखेरच्या षटकात प्रभमसिमरन याने सलग ६ चौकार लगावले. त्यानंतर सातव्या षटकात खेळण्यासाठी आल्यानंतर पुन्हा एक चौकार मारला. लागोपाठ सहा चौकार मारणारा प्रभसिमरन आयपीएलमधील तिसराच खेळाडू ठरलाय. याआधी अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांनी हा पराक्रम केला होता.

प्रभसिमरन याने मुकेश कुमार याच्या षटकात सलग सहा चौकार लगावले. तर २०२१ मध्ये पृथ्वी शॉ याने शिवम मावी याच्या षटकात सहा चौकार लगावले होते. तर अजिंक्य रहाणे यांने २०१२ मध्ये श्रीनाथ अरविंद याच्या षटकात सलग सहा चौकार लगावले होते. या विक्रमाची प्रभसिमरन याने बरोबरी केली आहे.

प्रभमसिमरन याने फक्त २६ चेंडूमध्ये ७६ धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या वादळी खेळीत ५ षटकार आणि ९ चौकार ठोकले. त्याला प्रियांश आर्या याने ४३ धावा करत चांगली साथ दिली. दोघांनी ४१ चेंडूत १२६ धावांची वेगवान भागिदारी केली. पंजाबला विजयासाठी दिल्लीने २६५ धावांचे लक्ष दिलेय. सलामीच्या या जोडीने हे आव्हान अतिशय सोपे केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT