Smriti mandhana and Harmanpreet Kaur Saam Tv
Sports

सेमी-फायनलपूर्वी टीम इंडिया हॉस्पिटलमध्ये! महत्वाच्या सामन्यातून कर्णधारासह प्रमुख खेळाडू होणार बाहेर

या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो.

Ankush Dhavre

India vs Australia t20 wc semi final: आज आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो.(Latest Sports Updates)

दक्षिण आफ्रिकेतून अशी बातमी समोर येत आहे की, हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर हे दोघेही सेमीफायनल सामन्यातून बाहेर होऊ शकतात. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. हे दोघे खेळणार की नाही याबाबत लवकरच संघव्यवस्थापक मोठी घोषणा करू शकतात.

सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील (Team India) खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करताना दिसून आले. मात्र हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर हे दोघेही आपल्या संघासोबत सराव करताना दिसून आले नाही.

इंडीयन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दोघांनाही आजारी असल्यामुळे स्थानिक रुग्णालयात दखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आता हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हरमनप्रीत कौर बाहेर झाली तर भारतीय संघाला बसणार मोठा धक्का..

सुरू असलेल्या आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत कौरला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. तिने ४ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना केवळ ६६ धावा केल्या आहेत.

मात्र तिच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने ४ सामन्यांमध्ये ३ सामने जिंकले आहेत. तसेच आयसीसीच्या नॉकआऊट फेरीत तिला खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे ती जर संघाबाहेर झाली तर नक्कीच भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागेल. तसेच पूजा वस्त्राकरने ४ सामन्यांमध्ये खेळताना २ गडी बाद केले आहेत. हे दोघेही खेळाडू खेळणार की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुती सरकार कोसळणार? वाल्मीक कराडचं नाव घेत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Crime News: 'टॉपर' पोरगा बनला हैवान! अख्खं कुटुंबाला संपवलं; मांजरीचाही घेतला जीव

Boredom Signs: 'काही समजं ना, काही उमजं ना', नुसतं मन तळमतंय? कशाचे आहेत हे लक्षणं? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन

T20 World Cup : अभिषेक शर्माची वर्ल्डकपमधून सुट्टी? सूर्यकुमार यादवच्या वक्तव्यानं चर्चेला जबरदस्त तडका

SCROLL FOR NEXT