दक्षिण आफ्रिकेला पराभतू करत भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचलाय. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत भारताने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. वर्ल्ड कपच्या ५२ वर्षांच्या इतिहासात भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
यावेळी हरमन प्रीतच्या टीमनं ट्रॉफी जिंकलीय. भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेते झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले. मोदींनी पोस्ट करत हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा ठरेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"२०२५ च्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय. अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी आश्चर्यकारक कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती." "संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक टीमवर्क आणि चिकाटी दाखवली. आमच्या खेळाडूंचे अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल." असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
"विश्वविजेत्या टीम इंडियाला सलाम. हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे कारण आमचा संघ आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून भारताचा अभिमान नवीन उंचीवर नेत आहे." तुमच्या उत्तम क्रिकेट कौशल्याने लाखो मुलींसाठी प्रेरणास्थान निर्माण केलंय. संपूर्ण टीमचे अभिनंदन." असं अमित शाह यांनी ट्विट करत भारतीय संघाचे कौतुक केलंय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केलंय. "ऐतिहासिक विजय... विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन! देशवासियांचे हार्दिक अभिनंदन! तुम्ही सर्वजण देशाचा अभिमान आहात. भारत माता की जय" अशी त्यांनी पोस्ट केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.