Hardik Pandya & Krunal Pandya Saam TV
Sports

IPL 2022: मुंबई इंडियन्स सोडल्यामुंळ हार्दिक पांड्याला लागणार मोठी लॉटरी!

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केले नाही.

वृत्तसंस्था

IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. नवीन फ्रँचाईजी अहमदाबादने हार्दिक पांड्याला कर्णधार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी श्रेयस अय्यर या संघाची कमान सांभाळणार असल्याच्या बातम्या येत होत्या पण आता मीडिया रिपोर्ट्सनुसार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अहमदाबादच्या संघाचा कर्णधार बनणार असल्याते वृत्त समोर आले आहे. फक्त हार्दिकच नाही तर रशीद खान देखील अहमदाबाद फ्रँचायझीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या अगोदरच हार्दिक पांड्याने आपल्या ट्विटरवरती मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात खेळणार नसल्याचे संकेत दिले होते. (IPL 2022 News In Marathi)

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केले नाही. पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता येत नाही आणि फलंदाजीतही त्याचा फॉर्म खराब होत आहे, त्यानंतर त्याला टीम इंडियामधूनही वगळण्यात आले आहे. परंतु, आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये अहमदाबाद फ्रँचायझी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. हार्दिक पांड्याला 92 आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे आणि यादरम्यान त्याने 1476 धावा केल्या आहेत. पांड्याची सरासरी 27.33 आहे आणि तो आयपीएलमधील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानला जातो. याशिवाय पांड्याच्या नावावर 42 विकेट्स आहेत आणि तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे.

राशिद खानही अहमदाबादमध्ये सामील होणार?

आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर राशिद खान देखील अहमदाबाद संघात सामील होणार असल्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादसोबत त्याची सर्व चर्चा झाली आहे. राशीद खानला सनरायझर्स हैदराबादने रिटेन ठेवण्यास नकार दिला होता. राशिद खानचा आयपीएल रेकॉर्ड अप्रतिम आहे. या लेग-स्पिनरने 76 सामन्यांत 93 बळी घेतले आहेत आणि इकॉनॉमी रेट प्रति षटक फक्त 6.33 धावा आहे.

इशान किशनही अहमदाबादचा भाग असू शकतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा आणखी एक खेळाडू अहमदाबाद संघात येण्याची शक्यता आहे. यष्टिरक्षक इशान किशन अहमदाबाद फ्रँचायझीचा तिसरा ड्राफ्ट खेळाडू असू शकतो. इशान किशन हा यष्टिरक्षकासोबतच स्फोटक सलामीवीरही आहे. त्याला नुकतेच भारतीय संघातही स्थान मिळाले होते. इशानने 61 आयपीएल सामन्यात 28.47 च्या सरासरीने 1452 धावा केल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: 16 व्या मजल्यावरून तरूणी पडली; रक्ताच्या थारोळ्यात पडला निर्वस्त्र मृतदेह, कुटुंबियांकडून हत्येचा आरोप

Maharashtra News Live Update: शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा 337 किमीपर्यंत विस्तार होणार; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला भविष्यातील मास्टर प्लॅन

Parbhani Accident : झरी-जिंतूर मार्गावर हिट अँड रन; भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Shocking : संतपाजनक! खाऊ देण्याच्या बहाण्यानं नराधमानं डाव साधला; अत्याचार करून ७ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT