Rohit Sharma-MS Dhoni, IPL 2023 SAAM TV
Sports

MS Dhoni's Retirement: पिक्चर अभी बाकी है...; धोनीच्या IPL रिटायरमेंटच्या चर्चेवर रोहित शर्मा बेधडक बोलला!

Rohit Sharma On MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनी याच्या क्रिकेट कारकिर्दीतली ही अखेरची आयपीएल स्पर्धा मानली जात आहे.

Nandkumar Joshi

IPL 2023, Rohit Sharma Vs MS Dhoni : आयपीएल २०२३ ही स्पर्धा वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या कारकिर्दीतील अखेरचं पर्व मानलं जात आहे. आयपीएल २०२३ च्या मोसमात खेळून धोनी संन्यास घेऊ शकतो. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यानं यावर बेधडक उत्तर दिलं आहे. रोहित शर्माचं उत्तर ऐकून धोनीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावणार नाही. अभी पिक्चर बाकी हैं असं उत्तर रोहित शर्माने दिलं आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा (IPL 2023) महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) अखेरची असेल. तो कदाचित निवृत्ती घेऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. पण याबाबतच्या चर्चेवर रोहित शर्मानं धोनीच्या चाहत्यांचं हृदय जिंकणारं उत्तर दिलं आहे. आयपीएलचं १६ वं पर्व सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रोहितने पत्रकार परिषदेत धोनीच्या रिटायरमेंटच्या चर्चेवर उत्तर दिलं आहे.(Latest sports updates)

रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, 'एमएस धोनी अजून इतका फिट आहे की आणखी दोन-तीन सीझन सहज खेळू शकेल. हे पर्व त्याचे शेवटचे असेल असे मला अजिबातच वाटत नाही.' दुसरीकडे धोनीचा अलीकडेच एक फोटो व्हायरल झाला होता. तो बघितला तर नक्कीच धोनी निवृत्ती घेणार नाही, असं वाटतंय.

धोनीच्या पॉवर गेमने सगळेच हैराण

धोनीचा अलीकडेच एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यात धोनीचे बायसेप्स बघून चाहते हैराण झाले. तो आपल्या खास शैलीत एक फटका खेळताना त्या फोटोत दिसत होता. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही त्याचे कौतुक केले. दुसरीकडे नेहमीप्रमाणे महेंद्रसिंग धोनी काही बोलला नाही. कधी निवृत्त व्हावे आणि किती खेळावे हे फक्त त्यालाच ठाऊक आहे.

२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणारा धोनी ४१ व्या वर्षीही जबरदस्त फिट आहे. मैदानावर त्याची चपळता कमी झालेली नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने ४ वेळा जेतेपद पटकावलं आहे. आयपीएलचे सर्वाधिक जेतेपद मिळवण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आहे.

मुंबईने (Mumbai Indians) रोहितच्या नेतृत्वाखाली ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीचा संघ यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा विजेता ठरल्यास तो रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी बरोबरी साधेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

SCROLL FOR NEXT