pakistan cricket team  yandex
क्रीडा

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद चिघळला! पाकिस्तानात येण्याच्या धमकीनंतर PCB ने BCCI ला दिली ऑर्डर

Pakistan Cricket Board: बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. दरम्यान PCB ने बीसीसीआयला ऑर्डर दिली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानात रंगणार आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही भारतीय संघाने पाकिस्तान खेळायला जाण्यासाठी नकार दिला आहे. बीसीसीआयचा नकार येताच, पीसीबीने २०२६ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला भारतात खेळण्यासाठी पाठवणार नसल्याची धमकी दिली. १९ जुलैला आयसीसीची बैठक होणार आहे. यापूर्वी पीसीबीने धमकी देण्यासह आणखी एक मागणी केली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचे म्हटले जात आहे. या स्पर्धेसाठी पीसीबीने जोरदार तयारीही सुरु केली आहे. पीसीबीने या स्पर्धेसाठीचं वेळापत्रकही तयार केलं आहे. इतकेच नव्हे तर, भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीख आणि ठिकाणही ठरलं आहे. मात्र यावेळीही बीसीसीआयमुळे पाकिस्तानला आपल्या वेळापत्रकात बदल करावा लागु शकतो. बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे.

यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. दरम्यान यावेळी बीसीसीआयने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याची मागणी केली आहे. असं झाल्यास भारती संघाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्यात येतील. दरम्यान पीसीबीने बीसीसीआयकडे, पाकिस्तान खेळण्यासाठी येणार नाही, हे लिहून मागितलं आहे.

काय आहे पाकिस्तानची मागणी?

पीसीबीच्या एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, जर भारत सरकार भारतीय खेळाडूंना पाकिस्तानात खेळायला पाठवण्याची अनुमती देत नसेल. तर हे त्यांनी लेखी स्वरुपात द्यावं. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार की नाही? या स्पर्धेतील सामने हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवले जाणार की नाही? याबाबत १९ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : श्रीनिवास पवार बारामती मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT