अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे.
ही स्पर्धा भारतात होत असल्यामुळे भारतीय संघाला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान सामन्याच्या एक दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मोठं वक्तव्य केलं आहे. (Pat Cummins)
वर्ल्डकप फायनलपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, 'आम्ही भारतात यापूर्वी ही या जल्लोषात खेळलो आहे. डेव्हिड वॉर्नर डान्स करतो, संघातील इतर खेळाडू मस्ती करतात. आमच्या संघात असे ६ ते ७ खेळाडू आहेत जे २०१५ मध्येही संघात कायम होते. त्यामुळे खेळाडूंना चागंलच माहित आहे की, मैदानावर जायचंय आणि खेळायचंय.' (Cricket World Cup)
या गोलंदाजाकडून सावध राहावं लागेल..
तसेच तो पुढे म्हणाला की,'हे खरं आहे की, तुम्ही जेव्हा मायदेशात खेळता तेव्हा त्याचा थोडाफार फायदा तुम्हाला होतो. मात्र आम्हीही भारतात खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे आम्हीही कॉन्फिडंट आहोत. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याकडून सावध राहावं लागणार आहे. १ लाख पेक्षा अधिक लोकांसमोर खेळणं हे आमच्यासाठी आव्हान असणार आहे. ' (Latest sports updates)
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ १५० वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाला ५७ सामने जिंकता आले आहेत .
या सामन्यासाठी अशी असू शकते ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:
ट्रेविस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क,अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.