Paris Paralympics 2024  Saam tv
Sports

Paris Paralympics 2024 : भारताला मिळालं दुसरं गोल्ड मेडल; IIT इंजिनीअर नितेश कुमारचा धमाकेदार परफॉर्मन्स, ब्रिटिश खेळाडूला चारली धूळ, VIDEO

Paris Paralympics 2024 Nitesh kumar : नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. नितेशने सेमीफायनलमध्ये जपानच्या डाइसुके फुजिहाराचा फुजिहाराचा पराभव केला होता. त्यानंतर फायनलमध्ये ब्रिटनच्या खेळाडूचा पराभव केला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी सुरु आहे. आता बॅडमिंटन खेळाडू नितेश कुमारने पुरुष एकेरीच्या एसएल वर्गात सुवर्ण पदक जिंकलं आहे. नितेशने २ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या डेनिल बेथेलला २१-१४,१८-२१,२३-२१ ने धूळ चारली आहे. दोघांमध्ये १ तास आणि २० मिनिटे सामना सुरु होता.

एसएल ३ वर्गातील खेळाडूंच्या शरीराचा कमरेखालील भागात गंभीर आजार असतो. या वर्गात खेळणाऱ्या नितेश कुमारने भारताला दुसरा गोल्ड मिळवून दिला आहे. याआधी अवनी लेखराने शुटिंगमध्ये गोल्ड जिंकलं होतं.

फायनल सामन्यात नितेश कुमारने पहिला गेम सहज जिंकला. त्यानंतर ब्रिटिश खेळाडूने कमबॅक केलं. दुसऱ्या गेममध्ये ब्रिटिश खेळाडूने सामना बरोबरीपर्यंत आणला. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अतितटीचा सामना झाला. यात नितेश कुमारने बाजी मारली. नितेश पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेंडल जिंकणारा दुसरा बॅडमिंटन खेळाडू आहे. प्रमोद भगतने टोकयो पॅरालिम्पिकमध्ये याच वर्गात गोल्ड जिंकला होता.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ९ पदक जिंकले आहेत. भारताने आतापर्यंत दोन गोल्ड, तीन सिल्वर,चार ब्रॉन्ज मेडल जिंकले आहेत. अवनी लेखराने R2 वूमेन्स १० मीटर एयर रायफल स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकला आहे. अवनीने पॅरालिम्पिक रेकॉर्डमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. तर मोना अग्रवालने कांस्य पदक जिंकलं आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं मेडल प्रीती पालने मिळवून दिलं आहे. तिने वूमेन्स १०० मीटर रेसमध्ये कांस्यपदक जिंकलं आहे. त्यानंतर नेमबाज मनीष नरवालने चौथं पदक जिंकलं. मेन्स १० मीटर एअर पिस्टलमध्ये सिल्वर पदक जिंकलं. तर रुबीना फ्रान्सिसने पाचवा पदक जिंकलं आहे. त्यानंतर प्रीती पाल, निषाद कुमार यांनी सिल्वर जिंकलं. पुढे योगेश कथुनियाने सिल्वर जिंकलं. आज नितेश कुमारने गोल्ड मेडल जिंकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT