Rubina Francis : पॅरालिम्पिकमध्ये भारताचं आज 'गोल्ड' मेडल निश्चित? रुबिना फ्रान्सिसची फायनलमध्ये धडक

Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये रुबिना फ्रान्सिसने 10 मीटर एअर पिस्टमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे भारताला आज गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता आहे.
Paris Paralympics 2024
Paris Paralympics 2024Saam Digital
Published On

पॅरालिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक मेडल निश्चित झालं आहे. रुबिना फ्रान्सिसने 10 मीटर एअर पिस्टमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे. सायंकाळी ६.१५ वाजता हा फायनल सामना होणार असून आजच पदकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Paris Paralympics 2024
आधी गॉलब्लॅडर काढलं, 5 महिन्याआधी शस्त्रक्रिया; गोल्ड मेडल जिंकणाऱ्या Avani Lekhara चा संघर्षमय प्रवास कसा आहे?

रुबिना फ्रान्सिस ही एक निपुण भारतीय पॅरा-शूटर आहे. तिने नेमबाजीत विशेषतः पॅरा-शूटिंग प्रकारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रुबिनाने पॅरा ऑलिम्पिकसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. 2021 मधील पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत तिने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

रुबिना फ्रान्सिसचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये झाला आहे. तिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. रुबिनाची संघर्ष यात्रा विशेष प्रेरणादायी आहे, कारण तिने अपंगत्वावर मात करून क्रीडाक्षेत्रात उत्तुंग यश मिळवलं आहे. ती आपल्या कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासामुळे अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.

Paris Paralympics 2024
India vs Pakistan Match : भारत-पाकिस्तानमध्ये होणार हायव्होल्टेज सामना; तारीख आणि खेळाडूंचीही झाली घोषणा, वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com