फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आजपासून ऑलिम्पिकची सुरुवात होत आहे. मात्र पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या काही तास आधी, फ्रेंच हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला जाळपोळ आणि तोडफोडीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेच्या यजमान देशाची वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. अनेक मार्गावरील ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, ज्याचा सुमारे 8,00,000 प्रवाशांना फटका बसला आहे.
पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांनी म्हटले आहे की, तोडफोड आणि जाळपोळीचं कृत्य पूर्वनियोजित होतं. त्यामुळे रेल्वे नेटवर्कवर मोठा आणि गंभीर परिणाम झाला आहे. फ्रेंच सुरक्षा दलांकडून जाळपोळीच्या घटनांमागे असलेल्यांचा शोध घेण्यात येत असून कठोरता कठोर शिक्षा केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काल रात्री, SNCF अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न हाय-स्पीड लाईनवर तोडफोड करण्यात आली. प्रतिष्ठानांचे नुकसान करण्यासाठी जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा आरोप, SNCF ने केला आहे. शुक्रवारी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या आधी रेल्वे स्थानकांवर असा प्रकार घडल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. या उद्घाटन सोहळ्याठी जगभरातील खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. तसंच जगभरातून प्रेक्षकही पॅरिसमध्ये आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांला जाळपोळ करणाऱ्यांनी लक्ष्य केलं आहे. त्यामुळे अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच प्रवाशांनी आपला प्रवास तात्पुरता रद्द करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत. दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र शनिवार व रविवारही वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान जाळपोळीच्या घटनेनंतर पॅरिसमध्ये कडेकडो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ४५ हजाराहून अधिक पोलीस, १० हजारांहून अधिकराचे जवान, २ हजार खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच छतांवर स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत. तर ड्रोनचीही करडी नजर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.