पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024) स्पर्धेत भारताने पदकांचं खातं उघडलं आहे. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं. मात्र सोमवारी भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) सात्विकराज (Satwik sairaj ranki reddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीला मोठा धक्का बसला आहे. पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या या जोडीचा दुसऱ्या फेरीतील सामना रद्द झाला आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
या स्पर्धेतील पहिल्या फेरीत चिराग आणि सात्विकराज यांनी फ्रान्सच्या कोरवी लुकास आणि लेबर रोननचा २१-१७, २१-१४ ने विजय मिळवला होता. या जोडीला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र या जोडीचा दुसरा सामना रद्द करण्यात आला आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर आज (२९ जुलै) ही जोडी दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार होती.
जर्मनीच्या मार्क लॅम्पफुसने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने दुखापतग्रस्त असल्याची माहिती बॅडमिंटन फेडरेशनला दिली आहे. त्यामुळे ही जोडी आता स्पर्धेतून बाहेर पडली आहे. ही जोडी आता पुढील दोन्ही सामने खेळताना दिसून येणार नाही.
या भारतीय जोडीने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला होता. मात्र जर पदक जिंकायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत शेवटचा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. ही भारतीय जोडी आपला शेवटचा सामना ३० जुलै रोजी इंडोनेशियाच्या अर्दियांतो मुहम्मद आणि अल्फियान फजर या जोडीविरुद्ध खेळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.