manu bhaker with sarabjot singh twitter
Sports

Sarabjot Singh: 'मला सरकारी नोकरी नको..' ब्राँझ मेडलिस्ट सरबजोत सिंगने नाकारली नोकरी,कारणही सांगितलं

Sarabjot Singh Rejects Government Job: भारताला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देणाऱ्या सरबजोत सिंगला सरकारने सरकारी नोकरीची ऑफर दिली होती. मात्र त्याने ही ऑफर नाकारली आहे. यासह त्याने कारणही सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Sarabjot Singh Government Job: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत नेमबाजांनी बाजी मारली. भारताने या स्पर्धेत एकूण ६ पदकं पटकावली. यापैकी ३ पदकं ही शूटिंगमध्ये होती. त्यामुळे भारताच्या यशात ५० टक्के वाटा हा भारतीय नेमबाजांचा राहिला. या स्पर्धेत मनू भाकरने (Manu Bhaker) पदकांचं खातं उघडलं. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला. त्यानंतर मनू भाकरने सरबजोत सिंगसोबत (Sarabjot Singh) मिळून कांस्य पदक पटकावलं.

सरकारी नोकरीची ऑफर

भारतात एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलं, तर त्यांचं जोरदार कौतुक केलं जातं. त्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला जातो. यासह त्याला सरकारी नोकरी देखील दिली जाते. जर तो खेळाडू सरकारी नोकरी करत असेल तर त्याचं प्रमोशन केलं जातं. दरम्यान भारतासाठी १० मीटर पिस्तूल शूटिंग मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकल्यानंतर सरबजोत सिंगलाही सरकारी नोकरीची ऑफर देण्यात आली. मात्र त्याने ही ऑफर नाकारली आहे.

सरकारी नोकरी नको

भारतीय नेमबाज सरबजोत सिंगने सरकारने दिलेली सरकारी नोकरीची ऑफर नाकारली आहे. त्याने यामागचं कारणही सांगितलं आहे. त्याला सध्यातरी नोकरी करायची नाहीये. त्याला आपलं संपूर्ण लक्ष शूटिंगवर केंद्रित करायचं आहे.

काय म्हणाला सरबजोत सिंग?

माध्यमांशी बोलताना सरबजोत सिंग म्हणाला की, ' नोकरी चांगली आहे. पण मला सध्या नोकरी करायची नाहीये. माझ्या कुटुंबातील लोकही मला नोकरी शोध असं म्हणतात. पण मला शूटिंग करायचं आहे. मी जे ठरवलंय मला तेच करायचं आहे. त्यामुळे मला मी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात जायचं नाही.'

काय आहे लक्ष?

तो म्हणाला की, ' अजूनही माझं काम अपूर्णच आहे. मला आशा आहे की, मी माझं लक्ष २०२८ मध्ये पूर्ण करेल. मी माझ्या डायरीत लिहून ठेवलं आहे की, मी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत माझी सर्वोत्तम कामगिरी करणार. मात्र अजूनही मी माझी सर्वोत्तम कामगिरी केलेली नाही.२०२८ मध्ये मी सुवर्णपदकावर निशाणा साधणार.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT