Neeraj Chopra Talk With PM Modi Saamtv
Sports

Paris Olympic: गोल्ड मेडल का आणता आलं नाही? नीरजने PMमोदींनाच सांगितलं कारण; फोनवर काय झाली चर्चा, पाहा व्हिडिओ

Neeraj Chopra Talk With PM Modi: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला पंतप्रधान मोदींनी फोन करून अभिनंदन केले. पीएम मोदींनी नीरजशी त्याच्या दुखापतीबद्दलही चर्चा केली.

Bharat Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याशी फोनवर बोलून रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदींशी बोलतांना नीरजने गोल्ड मेडल न मिळाल्याची खंत व्यक्त केली. आपल्याला देशासाठी गोल्ड मेडल आणायंच होतं? पण आणू शकलो नाही, असं म्हणत नीरजने सुवर्ण पदकापासून आपण का दूर राहिलो त्याची कारणेही सागितली.

पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पोस्ट करताना लिहिले आहे की, नीरज असंख्य आगामी खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला अभिमान मिळवून देण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं म्हटलंय. नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे खरे उदाहरण आहे. त्याने आपली प्रतिभा वेळोवेळी दाखवलीय. त्याला पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळाल्याचा भारताला आनंद आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. ते असंख्य आगामी खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला अभिमानास्पद करण्यासाठी प्रेरणा देत राहतील, असं मोदी म्हणालेत.

गोल्ड मेडल का हुकालं

पॅरिस ऑलिम्पिकमधील भालाफेकच्या स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक मिळालं. त्यानंतर पीएम मोदींनी नीरज चोप्राला फोन करून त्याचं अभिनंदन केलं, त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र पंतप्रधान मोदींशी बोलतांना नीरज मात्र नाराज झालेला दिसला. नेहमीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर चमक नव्हती. आपण देशासाठी गोल्ड मेडल आणू शकलो नाही, याची खंत त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.

काय म्हणाला नीरज चोप्रा

पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यानंतर आभार व्यक्त करताना नीरज म्हणाला,सर धन्यवाद! गोल्ड मेडलासाठी सर्वांच्या अपेक्षा होत्या त्या कुठे ना कुठे पूर्ण झाल्या नाहीत. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु पण कुठे ना कुठे तरी कमी पडलो.आपलं आधी बोलणं झालं होतं,त्यावेळीही दुखापतीसंदर्भात चर्चा झाली होती. त्या दुखापतीमुळे ते शक्य झालं नाही. मी काही तरी करायची उमेद घेऊन होतो परंतु मी काही करू शकलो नाही. माझी स्पर्धा खूप तगडी होती. त्यात दुखापत होती,अशी स्थितीत भाला फेकणं आणि देशासाठी मेडल आणणं हे आनंदाची गोष्ट आहे.

नीरजच्या बोलण्यातील दु:ख ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याला धीर देत तुम्ही चांगली चमकदार कामगिरी केल्याचं सांगितलं. त्यानंतर नीरजने नवी उमेद जागी करत आपण नव्या दमाने पुढील स्पर्धांना समोरे जाऊ आणि अजून पदकं जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT