manu bhaker coach twitter
Sports

Manu Bhaker Coach: मोठी बातमी! ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरच्या प्रशिक्षकांचं घर पाडलं जाणार?

Samaresh Jung: भारताला पदक जिंकून देणाऱ्या मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांच्या प्रशिक्षकांचं घर पाडलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Ankush Dhavre

भारतीय नेमबाज मनू भाकरने ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. मनू भाकरने १० मीटर पिस्तुल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं . त्यानंतर मनू आणि सरबजोत सिंग यांनी मिळून १० मीटर पिस्तुल मिश्र प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं होतं. दरम्यान या दोघांनी प्रशिक्षण देणाऱ्या नेमबाजी प्रशिक्षक समरेश जंग यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांचे राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक समरेश जंग यांचं घर पाडलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. समरेश जंग हे दिल्लीतील खैबर पास परिसरात राहतात. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, ज्या जमिनीवर हे घर आहे, संरक्षण मंत्रालयाच्या जमिनीवर आहे. त्यामुळे हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.

समरेश जंग यांची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यात म्हटलं गेलंय की, ' भारतीय नेमबाजांनी दोन पदकं जिंकली. या विजयानंतर मला अतिशय आनंद झाला. मात्र घरी परतल्यानंतर माझं घर आणि माझं कुटुंब २ दिवसात उद्धव्त होणार असल्याची बातमी मिळाली. मी एक ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कारविजेता असल्यामुळे मला आशा आहे की, मला आणि माझ्या शेजारच्यांना सन्मानान बाहेर जाता येईल. मला जागा खाली करण्यासाठी कमीत कमी दोन महिन्यांचा वेळ देण्यात यावा अशी विनंती करतो.'

तसेच त्यांनी लिहीले की, ' एक ऑलिम्पियन असल्यामुळे मला सन्मानाने निरोप देण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे.' यासह त्यांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. लोकांची घरी का पाडली जात आहेत? अचानक संपूर्ण वसाहत बेकायदेशीर कशी घोषित करण्यात आली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT