manu bhaker  twitter
Sports

Manu Bhaker Welcome: मनू भाकरचं भारतात ग्रँड वेलकम! जोरदार स्वागताचा VIDEO एकदा पाहाच

Manu Bhaker Welcome In India: भारताला २ पदकं जिंकून देणारी मनू भाकर भारतात परतली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने आतापर्यंत ३ पदकं पटकावली आहेत. ज्यात २ पदकं ही एकट्या मनू भाकरने २ पदकं जिंकली आहेत. दरम्यान २ पदक जिंकून भारतात परतल्यानंतर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Manu Bhaker Grand Welcome In Delhi)

मनू भाकरचं जोरदार स्वागत

कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावल्यानंतर मनू भाकर भारतात परतली आहे. भारताला पदक जिंकून देत तिने इतिहास रचला आहे. बुधवारी ती भारतात परतली. दरम्यान भारतात परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तिचं स्वागत करण्यासाठी हजारो भारतीय तिची आतुरतेने वाट पाहत होते. तिच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतासाठी पटकावली २ पदकं

इतर भारतीय खेळाडू पदक जिंकण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत. तर एकट्या मनू भाकरने भारतासाठी २ पदकं पटकावली आहेत. तिने १० मीटर पिस्तुल शूटिंग प्रकारात भारताला कांस्यपदक जिंकून दिलं. यासह ती महिलांच्या शूटिंग इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी पहिलीच महिला ठरली होती.

त्यानंतर १० मीटर पिस्तुल शूटिंग मिश्र प्रकारातही तिने शानदार खेळ केला आणि सरबज्योत सिंगसोबत मिळून कांस्यपदकावर नाव कोरलं. हे भारताचं या स्पर्धेतील दुसरं आणि मनू भाकरचंही वैयक्तिक दुसरं पदक ठरलं होतं. यासह २५ मीटर पिस्तुल शुटिंग प्रकारातील फायनलमध्येही तिने एन्ट्री केली होती. मात्र तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आयोगाची निष्पक्षता संपली, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा- खरगे

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

Blood Group and Diabetes: A, B, AB की O? कोणत्या ब्लड ग्रुपला डायबिटीजचा सर्वाधिक धोका?

Thane News: ठाकरेसेनेच्या नेत्याच्या हत्येमागे माजी महापौर शिंदेंचा हात?, ठाण्यात राजकारण तापले

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT