Paris Olympic 2024 Avinash Sable Struggle Story Profile:  Saamtv
क्रीडा

Who Is Avinash Sable: बीडच्या पोराने ऑलिम्पिक गाजवलं! वीट भट्टी कामगाराचा मुलगा ते भारताचा स्टीपलचेस चॅम्पियन; कोण आहे अविनाश साबळे?

Paris Olympic 2024 Avinash Sable Struggle Story Profile: लहानपणी आई वडिलांचा संघर्ष पाहिलेल्या अविनाशला परिस्थितीची जाणीव होती. याच परिस्थितीचे चटके सोसत त्याने आज बीड ते पॅरिस ऑलिम्पिक असा संघर्षमय प्रवास पूर्ण केला.

Gangappa Pujari

महाराष्ट्राचा सुपुत्र आणि बीडचा भूमीपुत्र असलेल्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे मैदान गाजवत नवा इतिहास रचला आहे. अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तीन हजार स्टीपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या संपूर्ण स्पर्धेत अविनाशने सातत्यपूर्ण कामगिरी करत स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

बीडच्या पोराने पॅरिस गाजवलं!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय धावपटू अविनाश साबळेने सोमवारी पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अविनाश या खेळामध्ये 8:15.43 सेकंदाचा वेळ घेत पाचव्या स्थानावर राहिला. यासह या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा साबळे हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. सात ऑगस्टला अविनाश अंतिम फेरीत खेळणार असून देशाला पदक मिळवून देऊ, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

कोण आहे अविनाश साबळे?

अविनाश साबळे हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तो भारतीय सैन्यदलात नोकरी करतोय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा हे त्याचे जन्मगाव. १३ सप्टेंबर १९९४ ला जन्मलेल्या अविनाशला लहानपणापासून धावण्याचा सराव होता. घरापासून शाळा लांब असल्याने तो धावत शाळेमध्ये जायचा. अविनाशची घरची परिस्थितीही बेतातीच.

बीड ते पॅरिसचा संघर्षमय प्रवास!

अविनाश साबळेचे आई- वडील वीट भट्टी कामगार होते. त्यामुळे शाळा, कॉलेज करत असतानाच अविनाश छोटी- मोठी कामे करत घरच्यांना हातभार लावत होता. १२ वी झाल्यानंतर तो भारतीय लष्करामध्ये भरती झाला. लहानपणी आई वडिलांचा संघर्ष पाहिलेल्या अविनाशला परिस्थितीची जाणीव होती. याच परिस्थितीचे चटके सोसत त्याने आज बीड ते पॅरिस ऑलिम्पिक असा संघर्षमय प्रवास पूर्ण केला.

अविनाशच्या या यशाचे देशभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अविनाशने सुरूवातीपासून आघाडी घेत पाचव्या स्थानासह फायनलमधील आपली जागा निश्चित केली आहे. आता अंतिम सामन्यात अविनाश कोणतं पदक मिळवतो? याकडेच कोट्यावधी भारतीयांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT