Shahid Afridi on IND vs PAK 
Sports

IND vs PAK : आता भारताला दुबईत हरवा, शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला

Shahid Afridi on IND vs PAK : पाकिस्तानने भारताला पुन्हा डिवचलं, शाहिद आफ्रीदी बरळला म्हणाला पाकिस्तानात येण्यास नकार देणाऱ्या टीम इंडियाला आता दुबईत जाऊन हरवा

Namdeo Kumbhar

राजू कासले

Shahid Afridi on IND vs PAK : तब्बल आठ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगतेय आणि याचं यजमानपद पाकिस्तान करतंय. पण या स्पर्धेच्या आधीच यजमान पाकिस्तानने टीम इंडियाला डिवचलंय. आणि याचं कारण ठरलंय पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचं भडकवणारं वक्तव्य...

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीने भारताला पुन्हा एकदा डिवचलं आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार नसल्याचं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

ही गोष्ट पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. कराची स्टेडिअमवर सहभागी सर्व देशांचे ध्वज फडकवण्यात आले. पण यात भारताचा ध्वज नव्हता. हे कमी की काय आता पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहीद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकलीय. पाहूया नेमक काय वक्तव्य केलं आहे.

आयसीसी स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तानवर नेहमीच भारी पडते, हे शाहिदला चांगलंच माहित आहे. त्यामुळे त्याने सामन्याआधीच पाकिस्तान क्रिकेट संघाला सावध केलंय. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत पाच वेळा आमने सामने आलेत. यात भारताने 2 वेळा विजय मिळवलाय तर पाकिस्तान संघ तीन वेळा जिंकलाय

भारत-पाकिस्तान आमने सामने

2004 - पाकिस्तान 3 विकेट्सने विजयी

2009 - पाकिस्तान 54 धावांनी विजयी

2013- भारताने 8 विकेट्सने विजयी

2017 - साखळी सामन्यात भारत 124 धावांनी विजयी

2017 अंतिम सामन्यात पाकिस्तान 180 धावांनी विजयी

आता 2017 च्या पराभवाचा बदला आणि शाहिद आफ्रिदीला उत्तर देण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT