Khushdil Shah Fight. google
Sports

Pak VS NZ : पाकिस्तानी खेळाडू सुधारणार नाहीत, सामना हरला अन् खेळाडू थेट फॅन्सला भिडला, मैदानातील VIDEO व्हायरल

Khushdil Shah Fight With Fans in Pak vs NZ Match: पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केले. या पराभवानंतर संतप्त पाकिस्तानी खेळाडू खुशदिल शाहने चाहत्यांशी वाद घातला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाकिस्तानी खेळाडू नेहमीच असे काही करतात की, ते सोशल मीडियावर हास्य किंवा टीकेचे पात्र बनतात. सध्या पाकिस्तान संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आणि ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना ५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना ४३ धावांनी जिंकला. ज्यामध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

वृत्तानुसार, पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्या संघाच्या पराभवानंतर काही टीका केल्या. यानंतर, पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू खुशदिल शाह स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो चाहत्यांशी भिडला.

पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावरुन, असा दावा केला जात आहे की, पाकिस्तानी खेळाडू खुशदिल शाहने सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांशी भांडण केले. द फ्री प्रेस जरनलमधील एका वृत्तानुसार, खुशदिलने चाहत्यांशी भांडण्यासाठी रेलिंगवरून उडी मारली. पण तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तिथे उभ्या असलेल्या चाहत्यांनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंवर वैयक्तिक टीका केली. यानंतर खुशदिलचा संयम सुटला.

खुशदिलचा संयम सुटला अन् चाहत्यांशी भिडला

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर जेव्हा पाकिस्तानी खेळाडू मैदानाबाहेर जात होते, तेव्हा अफगाणी प्रेक्षकांनी पाकिस्तानी खेळाडूंवर काही वैयक्तिक टीका केल्या. यानंतर संतप्त खुशदिल शाहला ते सहन झाले नाही आणि तो चाहत्यांशी वाद घालू लागला. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सुरक्षा कर्मचारी खुशदिलला रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. या कृत्याबद्द्ल खुशदिलला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

खुशदिलचे चाहत्यांशी भांडण का झाले?

इम्रान सिद्दीकी नावाच्या एका x युजरने लिहिले की, "दोन अफगाणी तरुणांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी गैरवर्तन केले. आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. खुशदिल शाहने त्याला शांत राहण्यास सांगितले. पण त्याने ऐकले नाही आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली."

पीसीबीने निवेदन जारी केले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवेदनात म्हटले की, जेव्हा पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या तेव्हा क्रिकेटपटू खुशदिल शाहने हस्तक्षेप केला आणि प्रेक्षकांना असे न करण्याचे आवाहन केले. याच्या उत्तरात अफगाण प्रेक्षकांनी पश्तो भाषेत शिवीगाळ केली. ज्यामुळे परिस्थिती आणखी वाईट झाली. पाकिस्तान संघाच्या तक्रारीनंतर या दोन्ही प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या कारणांवरून पाकिस्तानी आणि अफगाण प्रेक्षकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.

पाकिस्तानचा लाजिवाणा पराभव

पाकिस्तानी संघाला एकदिवसीय तसेच टी-२० मध्ये न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडने पाकिस्तानला ४-१ ने हरवले. यानंतर, ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही संघाचा व्हाईटवॉश झाला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला ४२ ओव्हरच्या सामन्यात २६५ धावांचे लक्ष्य दिले होते. पण पूर्ण पाकिस्तान संघ फक्त २२१ धावांवर ऑलआउट झाला.आणि ४३ धावांनी सामना हारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT