Asia Cup Super 4 Points Table Saam tv
Sports

Asia Cup 2023: ..तर पाकिस्तान थेट फायनल गाठणार! पावसामुळे सर्व सामने रद्द झाल्यास कसं असेल समीकरण? जाणून घ्या

India vs Pakistan Match: जर पावसामुळे सर्व सामने रद्द झाले तर कोणते २ संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार?

Ankush Dhavre

Asia Cup Super 4 Points Table:

आशिया चषकात पाकिस्तानने आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. पाकिस्तानने सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशवर जोरदार विजय मिळवला आहे. आता पाकिस्तानचा पुढील सामना येत्या १० सप्टेंबर रोजी भारतीय संघाविरूद्ध रंगणार आहे.

सुपर ४ फेरीतील ५ सामने हे कोलंबोच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. पुढील १० दिवस कोंलबोत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे बहुतांश सामने रद्द होऊ शकतात. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाणार आहे. असं झाल्यास कोणता संघ अंतिम सामन्यात जाणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

पाकिस्तानचा सुपर ४ फेरीतील पहिला सामना बांगलादेश संघाविरूद्ध खेळवला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारत २ गुणांची कमाई केली आहे. आता पाकिस्तानचे पुढील सामने जरी रद्द झाले तरी पाकिस्तानचा संघ ४ गुणांसह अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो.

जर पुढील सामने रद्द झाले तर पहिला सामना गमावला असल्यामुळे बांगलादेशचा संघ जास्तीत जास्त २ गुणांची कमाई करू शकतो. त्यामुळे बांगलादेशचा संघ अंतिम सामन्यात पोहचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

भारत की श्रीलंका? कोण जाणार अंतिम सामन्यात ?

जर आशिया चषकातील सर्व सामने पावसामुळे धुतले गेले तर, भारत आणि श्रीलंकेचे प्रत्येकी ३-३ गुण होतील. म्हणजेच दोन्ही संघ बरोबरीत असतील. गुणतालिकेत सामना जिंकणाऱ्या संघाला २ गुण दिले जातात.

तर सामना रद्द झाल्यास संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जातात.पाकिस्तानचे जर ४ गुण असतील तर पाकिस्तानचा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर श्रीलंका आणि भारत या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केले जाईल. कारण जर या दोन्ही संघांचा एकही सामना होऊ शकला नाही, तर नेट रनरेट नुसार निकाल लावता येणार नाही. (Latest sports updates)

भारत - पाकिस्तान येणार आमने -सामने..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ फेरीतील सामना रविवारी खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने पहिला सामना जिंकला आहे.तर भारतीय संघाचा हा सुपर ४ फेरीतील पहिलाच सामना असणार आहे.

या सामन्यासाठी आशियाई क्रिकेट मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली आहे. हा सामना जर १० सप्टेंबरला पुर्ण होऊ शकला नाही, तर हा सामना ११ सप्टेंबरला खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मैत्रिणीनेच रचला कट, १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: फक्त १ मिनिटं उशीर झाल्याने परीक्षेचा बसून दिले नाही, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Gold Price :सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Railway Recruitment: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, १०१० पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदीत मोठी बचत, ८६ हजार रुपयांची सूट घेण्याची संधी

SCROLL FOR NEXT