IND vs Pak In U-19 Asia Cup: 
क्रीडा

IND vs Pak: अजानची झुंझार शतकी खेळी, U-19 आशिया चषकात पाकिस्तानकडून भारताच्या यंगीस्थानचा दणदणीत पराभव

Vishal Gangurde

IND vs Pak In U-19 Asia Cup:

दुबईत सुरु असलेल्या अंडर-१९ आशिया चषकाच्या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ टीम इंडियाला भारी पडला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानने ८ गडी राखून भारताच्या यंगीस्थानचा पराभव केला आहे. (Latest Marathi News)

U-19 आशिया चषकाच्या स्पर्धेतील सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ गडी गमावून २५९ धावा केल्या. टीम इंडियाने दिलेलं आव्हान पाकिस्तानच्या संघाने सहज पार केलं.

टीम इंडियाच्या आदर्श सिंह , उदय आणि सचिन या तिघांची खेळी व्यर्थ ठरली. टीम इंडियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजानने शतकी खेळी करत सामना जिंकला.

२ गडी राखून पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव

२६० धावांचा पाठलाग करताना टीम पाकिस्तानने पहिल्या पाच षटकातच शमील हसैन बाद झाला. त्याने १५ चेंडूत फक्त ८ धावा करून बाद झाला. शमील बाद झाल्यानंतर शाहजेब आणि अजानने डाव सावरला. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावा केल्या.

शाहजेबने ८८ चेंडूत ६३ धावा करून बाद झाला. शाहजेबनंतर सादने अजानला साथ दिली. या दोघांनी १२५ धावांची भागीदारी रचली. अवैसने १३० चेंडूत १०५ धावा केल्या. तर सादने ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. भारतासाठी अभिषेकने २ गडी बाद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाची चांगली फलंदाजी

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली झाली. आदर्श सिंह आणि अर्शिन कुलकर्णीने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावा केल्या. भारताने पहिल्या १० षटकात १ गडी बाद ४२ धावा झाल्या होत्या.

कर्णधार सहारन आणि आदर्शने तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावा केल्या. चांगली फलंदाजी करत आदर्श ६२ धावांवर बाद झाला. तर कर्णधार उदय सहरनने ९८ चेंडूत ६० धावा केल्या. तर सचिन धस ४२ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. पाकिस्तानसाठी मोहम्मद जीशानने ४, उबैद शाह आणि अमिर हसनसाठी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT