India vs pakistan  saam tv news
Sports

IND vs PAK: डर का माहौल..! विराट अन् रोहितला रोखण्यासाठी PAK च्या गोलंदाजांनी केलाय हा खास प्लान

India vs Pakistan News In Marathi: भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाजांनी खास प्लान केला आहे.

Ankush Dhavre

India vs Pakistan News:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचे गोलंदाज मोहम्मद नवाज आणि लेग स्पिनर शादाब यांचा थरकाप उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माचा सामना करण्यासाठी दोघेही विशेष सराव करताना दिसून आले आहेत.

पाकिस्तान संघातील गोलंदाज मोहम्मद नवाज आणि लेग स्पिनर शादाब हे दोघेही नेट्समध्ये फलंदाजांना गोलंदाजी करत नव्हते. हे दोघेही गोलंदाज गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलच्या स्पेशल ट्रेनिंग घेताना दिसून आले. हे दोघेही गोलंदाज स्पॉट गोलंदाजीवर भर देताना दिसून आले आहेत.

पाकिस्तानी गोलंदाजांचा खास सराव..

पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने मोहम्मद नवाज आणि लेग स्पिनर शादाबला खास ट्रेनिंग दिली आहे. त्याने खेळपट्टीवर सहा मीटर आणि चार मीटरच्या रेंजमध्ये प्लास्टिक स्टम्प ठेवले. त्यानंतर त्याने आपल्या फिरकी गोलंदाजांना अचुक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सांगितले.

या फिरकीपटूंनी देखील अचुक टप्प्यावर गोलंदाजी केली. गोलंदाजीसह पाकिस्तानी खेळाडूंनी क्षेत्ररक्षणावर देखील जोरदार भर दिला. (Latest sports updates)

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर हे संघ आतापर्यंत १२३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ५६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर पाकिस्तानने ७३ सामन्यांमध्ये पाकिस्तानने बाजी मारली आहे.

तर गेल्या १० सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तर भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे. १० पैकी ७ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. यापैकी १ सामना अनिर्णित राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT