Pak Vs Eng 1st Test/ICC-Twitter
Pak Vs Eng 1st Test/ICC-Twitter SAAM TV
क्रीडा | IPL

Pak Vs Eng Test: इंग्लंडनं अक्षरशः पाकिस्तानची पिसं काढली; 145 वर्षांत जे घडलं नव्हतं ते करून दाखवलं!

Nandkumar Joshi

Pakistan Vs England Test : पाकिस्तानच्या भूमीवरच पाहुण्या इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या तेजतर्रार गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. पहिल्या कसोटीतच पाकिस्तानच्या गोलदाजांचं पितळ उघडं पाडलं. इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्याच दिवशी विस्फोटक फलंदाजी केली आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले.  (Latest Marathi News)

इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका होत असून, पहिली कसोटी रावळपिंडीच्या मैदानात सुरू आहे. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो पथ्यावरच पडला. फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानच्या भूमीवर इंग्लंडच्या क्रिकेट संघानं ऐतिहासिक विक्रम केला.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या ४ बाद ५०६ धावा झाल्या होत्या. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी एखाद्या संघानं ५०० पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंग्लंडनं हा कारनामा केला. पहिल्या दिवशी इंग्लंडकडून खेळताना चार फलंदाजांनी शतके ठोकली. ब्रूक यानं नाबाद १०१ धावा, जॅक क्रॉलीनं १२२ धावा, बेन डकेट यानं १०७ धावा तर ओली पोप यानं १०८ धावा कुटल्या. (Sports News)

पाकिस्तानचा भरवशाचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या अनुपस्थितीत होत असलेल्या कसोटीत पहिल्याच दिवशी पाकिस्तानचे इतर गोलंदाज नांगी टेकताना दिसले. फिरकीपटू जाहीद महमूद यानं दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद अली आणि हारिस रऊफ यानं प्रत्येक एक विकेट घेतली.

हॅरी ब्रूकनं सलग ६ चौकार ठोकले

याच कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक यानं विस्फोटक खेळी केली. त्यानं शतक साकारलं. पहिल्या दिवशी ८१ चेंडूंत १०१ धावा करून तो नाबाद राहिला. त्यानं पाकिस्तानी गोलंदाजांनी धुलाई केली. ब्रुकने सउद शकील याला एकाच षटकात लागोपाठ सहा चौकार ठोकले. त्यानं एका विश्वविक्रमाची बरोबरी केली.

यापूर्वी एका षटकात ६ चौकार मारण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या, वेस्टइंडीजचा रामनरेश सरवन आणि ख्रिस गेल यांच्या नावावर आहे. हॅरी ब्रूकने या तिघांच्या विक्रमाशी बरोबरी केली. सरवननं भारताविरुद्ध हा विक्रम केला होता. त्यानं २००६ मध्ये मुनाफ पटेल याला सहा चौकार लगावले होते.

इंग्लंडनं ऐतिहासिक कामगिरी केली

पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं ५०६ धावा केल्या. हा एक विश्वविक्रम आहे. कसोटी इतिहासात पहिल्या दिवशी ५०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा पहिला संघ ठरला. यापूर्वी पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. १९१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी ४९४ धावा केल्या होत्या. इंग्लंडनं हा विक्रम मोडीत काढला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT