PV Sindhu, malaysia open, TAI Tzu Ying saam tv
Sports

Malaysia Open 2022 : सिंधूचा पराभव; तई त्झु यिंगच्या बॅक हॅंडची चर्चा (व्हिडिओ पाहा)

सिंधूला आजच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूवर म्हणावा तितका प्रभाव पाडता आला नाही.

साम न्यूज नेटवर्क

क्वालाल्मपूर : मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन (Malaysia Open Super 750) स्पर्धेत आज (शुक्रवार) भारताची बॅडमिंटनपटू (badminton) पीव्ही सिंधू (p v sindhu) हिचा उपांत्यपुर्व फेरीत पराभव झाला. सिंधूवर गतविजेत्या तई त्झु यिंग हिने २१-१३, १५-२१, १३-२१ असा विजय (victory) मिळविला. (Malaysia Open Super 750 Latest News)

या लढतीत सिंधूची सुरुवात काहीशी निराशजनक झाली. ती (2-5) अशी पिछाडीवर होती. त्यानंतर तिने उत्तम खेळ करीत (11-7) अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत तिने तई त्झु यिंगवर पहिला सेटमध्ये (21-17) असे वर्चस्व मिळविले.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र तई त्झु यिंगने शानदार खेळ केला. ब्रेकमध्ये 5-1, 6-1 अशा आघाडीसह 11-3 ने ती आघाडीवर होती. सिंधूला दुसऱ्या सेटमध्येही कमालीचा संघर्ष करावा लागला. तिने जाेरदार खेळाचे प्रदर्शन घडवित तिने पाच गुण मिळवले. मात्र त्यानंतर तई त्झु यिंगने सिंधूला एकही संधी दिली नाही. तिने दुसरा सेट 21-15 असा जिंकला.

तिसरा आणि अंतिम सेट सुरुवातीपासूनच रोमांचक झाला. सिंधू ५-६ अशी पिछाडीवर होती, तिथून गुणसंख्या ६-७ झाली. ब्रेकमध्ये सिंधू अवघ्या दोन गुणांनी मागे होती. मात्र तिला प्रभाव पाडता आला. निर्णायक सेटमध्ये सिंधूचा 13-21 असा पराभव झाला. आजच्या पराभवामुळे सिंधूचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT