Maharashtra Kesari, Sangli, Mahlia Maharashtra Kesari Kusti Spardha saam tv
Sports

Mahila Maharashtra Kesari Kusti Spardha : महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मल्लांचे हाल, फरशीवर बसून लागलं जेवायला, पाण्याचा ठणठणाट

गुरुवारपासून सांगलीत स्पर्धेस प्रारंभ झाला.

विजय पाटील

Women Maharashtra Kesari Kusti Spardha : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत (Mahlia Maharashtra Kesari Kusti Spardha Sangli) पार पडत आहेत. यासाठी राज्यातील जवळपास 400 हून अधिक महिला कुस्तीगिर सांगलीत दाखल झाल्या आहेत. मात्र कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. (Maharashtra News)

ज्या क्रीडा संकुलाच्या आवारात कुस्ती स्पर्धा होत आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट चालू नव्हती. त्यामुळे अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावे लागत होतं. याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची सोय करण्यात आली होती, त्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन पाहायला मिळालं.

क्रीडा संकुलाच्या अत्यंत छाेट्याशा अशा मेसमध्ये महिला कुस्तीगिरांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे भली माेठी रांग मेसच्या बाहेर लागली हाेती. अनेकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.

आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपटूंना फरशीवर बसून जेवण करावे लागेल. पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील नीट नव्हती. जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी देखील कुस्तीगीरांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती.

या बराेबरच महिलांची राहण्याची व्यवस्था देखील नीट नसल्याच्या तक्रार करण्यात येत होत्या. महाराष्ट्र कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत. मात्र यामध्ये नियोजनाचा मोठा अभाव होता. ज्यामुळे महिला कुस्तीपट्टूंची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT