भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेल २७ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडू कमबॅक करु शकतात. दरम्यान डावाची सुरुवात करण्यासाठी कोण जाणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जाणून घ्या काय आहेत पर्याय?
झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली होती. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत, त्यामुळे या जोडीरला सलामीला जाण्याची संधी दिली जाऊ शकते.
झिम्बावेविरुद्ध झालेल्या मालिकेत शतकी खेळी करणाऱ्या अभिषेक शर्मालाही डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. यशस्वी जयस्वालच्या अनुपस्थितीत त्याला शुभमन गिलसोबत ही संधी मिळू शकतो. अभिषेक शर्मा संघाला आक्रमक सुरुवात करुन देऊ शकतो.
ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघातील सर्वात अंडररेटेड बॅट्समन आहे. सातत्याने चांगली सुरुवात करुन देऊनही त्याला संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. त्याचा झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. या मालिकेत तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दरम्यान ऋतुराज गायकवाड देखील सलामीसाठी योग्य पर्याय आगे. कारण आयपीएल स्पर्धेत तो डावाची सुरुवात करतो.
शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मोहम्मद सिराज,वहार्दिक पंड्या, रिंकू सिंग.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.