vinod kambli saam tv
Sports

Vinod Kambli: विनोद कांबळीचं चुकलं कुठं? सचिनच्या तोडीस तोड, सुपरस्टार खेळाडूची अवस्था अशी का?

Vinod Kambli Emotional Story: एकेकाळी सचिने तेंडूलकरलाही मागे सोडेल असं म्हटलं जाणाऱ्या विनोद कांबळीचं नक्की चुकलं तरी कुठं?

Ankush Dhavre

काय होतास तू, काय झालास तू..असंच काहीसं भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीबद्दल म्हटलं जात आहे. एकेकाळी सचिन तेंडुलकरपेक्षाही पुढे जाणार असं म्हटलं जाणारा विनोद कांबळी जगण्यसाठी धडपड करताना दिसतोय. सचिनसोबत मिळून वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या विनोद कांबळीने भारतीय संघाकडून खेळतानाही शानदार सुरुवात केली होती.मग विनोद कांबळीसोबत असं काय घडलं की त्याच्यावर ही वेळ आली.

काही दिवसांपासून विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ज्यात विनोद कांबळीला धड चालताही येत नव्हतं. मैदानावर खेळताना चौकार, षटकारांचा पाऊस पाडणारा, बॅक टू बॅक शतक झळकावणारा विनोद कांबळी आज दयनीय अवस्थेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विनोद कांबळी बाईकचा आधार घेऊन उभा आहे.

मात्र चालण्याचा प्रयत्न करत असतानाता तो अडखळताना दिसतोय. अरे आई शप्पथ कांबळी आहे...असं व्हिडिओमध्ये कोणीतरी म्हणताना दिसतोय. एकवेळ आपल्या स्टाइलिश लुकसाठी प्रसिद्ध असलेल्या विनोद कांबळीला आज आपली ओळख पटवून देऊनही कठीण झालं आहे.

विनोद कांबळीला झालंय तरी काय?

विनोद कांबळी ५२ वर्षांचा आहे. त्यामुळे फार वय झालंय म्हणून त्याची अशी अवस्था झाली असं नाही. माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं जातंय की, गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्याची प्रकृती नाजूक असल्याचं दिसून येत आहे.

पत्नीने दाखल केला होता गुन्हा

विनोद कांबळी हा आपल्या मैदानावरील कामगिरीसह कौटुंबिक कारणामुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली होती. विनोद कांबळीने मध्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. विनोद कांबळीच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी विनोद कांबळी विरुद्ध भादंवि कलम ३२४ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. विनोद कांबळीने वांद्र्यातील फ्लॅटवर जाऊन त्याच्या पत्नीला पॅनचा हँडल फेकून मारला होता. यादरम्यान तिला गंभीर दुखापतही झाली होती.

नोकरीची केली होती मागणी

एकेकाळी कोट्यावधींची कमाई करणारा विनोद कांबळी काही महिन्यांपूर्वी आर्थिक संकटात अडकला होता. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या ३० हजारांच्या पेन्शनवर तो कुटुंबाचं पोट भरतोय असं म्हटलं जात होतं. एका मुलाखतीत त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. त्याची ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर अनेक उद्योगपतींनी त्याला नोकरीची ऑफर दिली होती.

अशी राहिलीये क्रिकेट कारकिर्द

विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघासाठी १०४ वनडे आणि १७ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४ शतक, २ द्विशतक आणि ३ अर्धशतकं झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १०८४ धावा केल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने २ शतक आणि १४ अर्धशतकांच्या साहाय्याने २४७७ धावना केल्या होत्या. तो २००० मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. दरम्यान २००९ मध्ये त्याने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT