Babar Azam Resigned saam tv
क्रीडा

Babar Azam Resigned: आता वेळ आली आहे की...; वर्षभरात बाबर आझमने दुसऱ्यांदा सोडली कॅप्टन्सी, कारणही सांगितलं!

Surabhi Jagdish

पाकिस्तानच्या टीममध्ये पुन्हा एकदा काहीतरी बिनसलं असल्याचं दिसून येतंय. याचं कारण म्हणजे पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टी-20 वर्ल्डकप 2024 पासून बाबर आझमच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होती. अशातच त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

टी-20 वर्ल्डकप 2024 पासून बाबर आझमच्या कर्णधारपदाबाबत चर्चा रंगत होत्या. पाकिस्तान टीमच्या खराब खेळीनंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्या. 6 हे प्रकरण काही थंडावलं असातनाच बाबर आझमच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमध्ये बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केलीये.

राजीनामा दिल्याचं कारण काय?

नुकतंच बाबर आझमने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये टीमचं नेतृत्व करणं ही सन्मानाची गोष्ट आहे, परंतु आता माझ्यावर पद सोडण्याची आणि माझ्या खेळण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे, असं म्हटलंय.

खेळावर फोकस करणार बाबर आझम?

बाबरने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मला माझ्या खेळातील कामगिरीला प्राधान्य द्यायचंय. याशिवाय मला माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, ज्यामुळे मला आनंद होतो. हे पद सोडल्यानंतर पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट होईल. मला माझ्या खेळावर आणि वैयक्तिक विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास अधिक वेळ मिळेल.

कर्णधारपदाचा अनुभव केला व्यक्त

कर्णधारपदाचा अनुभव माझ्यासाठी चांगला होता. परंतु त्यासोबत आता कामाचा ताणही वाढताना दिसतोय. तुमच्या मला आतापर्यंत दिलेल्या समर्थनाबद्दल आणि माझ्यावरील विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमचा उत्साह माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण मिळून जे काही साध्य केलंय त्याचा मला अभिमान आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असंही बाबरने म्हटलं आहे.

वर्षभराच्या आत दोन वेळा राजीनामा

मुख्य म्हणजे बाबर आझमने एका वर्षाच्या आता कर्णधारपदाचा हा दुसऱ्यांदा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्याने २०२३ च्या वनडे वर्ल्डकपनंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. वनडे वर्ल्डकपनंतर बाबरने १५ नोव्हेंबर २०२३ रोजी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel War: इराणचा इस्त्राईलवर मिसाईल हल्ला, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

VIDEO: घोषणांचा पाऊस, अनुदानाचा दुष्काळ! कांदा उत्पादकांचे 24 कोटी कधी देणार?

Amit Deshmukh: सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT