New Zealand vs Bangladesh World Cup Match: Saam tv
Sports

New Zealand vs Bangladesh World Cup Match: बांगलादेशच्या फलंदाजांची 245 धावापर्यंत मजल; न्यूझीलंड विजयाची हॅटट्रीक पूर्ण करणार का?

New Zealand vs Bangladesh World Cup Match: प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने ५० षटकात ९ गडी गमावून २४५ धावा कुटल्या.

Vishal Gangurde

New Zealand vs Bangladesh World Cup Match:

आज विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात ११ वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने ५० षटकात ९ गडी गमावून २४५ धावा कुटल्या. फलंदाज मुशाफिकूर रहीमने सर्वाधिक ६६ धावा कुटल्या. तर न्यूझीलंडच्या लॉकीने तीन गडी बाद केले आहे. (Latest Marathi News)

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. लिटन दास पहिल्याच चेंडूत बाद झाला.

लॉकीने ८ व्या षटकातील अखेरच्या चेंडूत हसनला झेलबाद केले. न्यूझीलंडने ५६ धावांवर मिराजच्या रुपाने बांगलादेशला तिसरा धक्का दिला. त्यानंतर ग्लेनने त्याच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूत शांतोला बाद केले. न्यूझीलंडच्या आक्रमक गोलंदाजीमुळे बांगलादेशने १९ षटकात ४ गडी गमावून ८४ धावा केल्या होत्या.

बांगलादेशने ४ गडी बाद झाल्यानंतर शाकिब हल हसन आणि मुशफिकूर रहीमने संघाचा डाव सांभाळला. २९ व्या षटकात रहिमने अर्धशतक पूर्ण केलं. पुढे ६६ धावांवर रहीम बाद झाला. न्यूझीलंडने त्यांची भागीदारी तोडून पुन्हा एकदा बांगलादेशवर दबाव निर्माण केला. त्यानंतर बांगलादेशची पडझड सुरूच राहिली.

मुस्तफिजुर रहमान देखील लवकर बाद झाला. त्याने १० चेंडूत ४ धावा केल्या. बांगलादेशने ५० षटकात ९ गडी गमावून २४५ धावापर्यंत मजल मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT