आफ्रिकेतील नव्या कोरोना Varientमुळे भारताचा आफ्रिका दौरा धोक्यात
आफ्रिकेतील नव्या कोरोना Varientमुळे भारताचा आफ्रिका दौरा धोक्यात Twitter
क्रीडा | IPL

आफ्रिकेतील नव्या कोरोना Varientमुळे भारताचा आफ्रिका दौरा धोक्यात

वृत्तसंस्था

कोरोनाच्या नवीन प्रकारानी (Corona-19 New Varient) दक्षिण आफ्रिकेत (Sauth Africa) कहर करायला सुरुवात केली आहे. न्यूझीलंडच्या जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया दौऱ्यानंतर भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये 3 कसोटी, 3 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खेळाडूंची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल या दौऱ्यात पाहायला मिळतो की हा दौराच धोक्याचा ठरतो हे येणार काळ सांगेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India B vs SA) यांच्यात जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, केपटाऊन आणि पर्ल येथे सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून आणि शेवटचा T20 सामना 25 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. देशात कोविडचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने हाय अलर्ट लागू केला आहे. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमाला सांगितले की, “आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि CSA च्या संपर्कात आहोत. अशा कठीण काळात, आपण फक्त आशा करू की संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल तेव्हा सर्व गोष्टी नियंत्रणात असतील."

दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचे दोन सामने रद्द करण्यात आले आहेत. कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आज दोन्ही संघांचा पहिला सामना खेळवला जात आहे. उर्वरित सामने रद्द झाल्यानंतरही उड्डाण न झाल्याने नेदरलँडचा संघ ३ डिसेंबरपर्यंत दक्षिण आफ्रिकेत राहणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या प्रकाराची लाट पाहता भारतीय संघाचा आगामी दौराही धोक्यात येऊ शकतो. त्यानंतर यूके सरकारने दक्षिण आफ्रिका आणि इतर पाच दक्षिण आफ्रिकन देशांमधून उड्डाणांवर बंदी घातली आहे. देशाच्या उत्तरेकडील भागात प्रकरणे वाढत आहेत आणि कसोटी मालिकेतील किमान दोन ठिकाणं, जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, या नवीन पॅटर्नसाठी असुरक्षित असू शकतात.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT