virat kohli twitter
क्रीडा

Naveen Ul Haq Instagram Story: RCB च्या पराभवानं विराटचे डोळे पाणावले; नवीनने स्टोरी शेअर करत उडवली खिल्ली

Naveen Ul Haq -Virat Kohli: नवीन उल हकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची खिल्ली उडवणारी स्टोरी शेअर केली आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Emotional Photo: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या महत्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर गुजरातच्या विजयाने मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळाले आहे.

या सामन्यात विराटने जोरदार कामगिरी करत स्पर्धेतील सलग दुसरे शतक झळकावले. मात्र पराभव पदरी पडल्याने विराट भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यानंतर नवीन उल हकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची खिल्ली उडवणारी स्टोरी शेअर केली आहे.

गुजरात टायटन्स संघ या स्पर्धेत प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये लढत सुरू होती. अखेर गुजरातच्या विजयानं मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.

नवीनने उडवली खिल्ली..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा गोलंदाज नवीन उल हकने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी शेअर करत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची खिल्ली उडवली आहे.

त्याने एका हसणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या पराभवानंतर शेअर केला आहे. यावरून स्पष्ट आहे की, नवीन उल, विराट सोबत झालेला वाद विसरला नाहीये. (Latest sports updates)

गुजरातचा विजय..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने १०१ धावांची खेळी केली.

तर फाफ डू प्लेसिसने २८ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १९७ धावा केल्या होत्या.

आव्हान तसं मोठं होतं, मात्र गिलने न डगमगता संघाला चांगली सुरुवात करून दिली. या डावात त्याने ५२ चेंडूंचा सामना करत नाबाद १०४ धावांची खेळी केली.

विजय शंकरने त्याला चांगली साथ दिली. त्याने या डावात ५३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावे केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव आज पुन्हा वाढले; पाहा किती आहे 24 कॅरेटचा भाव?

New Marathi Movie: प्रथमेश परब आणि शशांक शेंडेचा 'श्री गणेशा' लवकरच; चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra News Live Updates: छत्तीसगडमध्ये चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

Escalator In Marathi: एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात?

SCROLL FOR NEXT