Nathan Lyon  Saam Tv
Sports

Nathan Lyon :लायनने दिल्लीचं मैदान मारलं !पंचक घेताच झाली 'या' २ मोठ्या विक्रमांची नोंद

भारतीय संघाचा पहिला डाव सुरु असताना त्याने २९ षटके गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने ४१ धावा खर्च करत ५ गडी बाद केले आहेत. यासह त्याच्या नावे २ मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.

Saam TV News

ccc

दुसऱ्या भारतीय संघाचा पहिला डाव सुरु असताना त्याने २९ षटके गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने ४१ धावा खर्च करत ५ गडी बाद केले आहेत. यासह त्याच्या नावे २ मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.

भारतीय संघ ज्यावेळी फलंदाजीला त्यावेळी नॅथन लायनच्या गोलंदाजीचा सामना करताना भारतीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याने या डावात रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि केएस भरतला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. (Latest Sports Updates)

नॅथन लायनने घातली या मोठ्या विक्रमांना गवसणी..

दिल्लीचा मैदानावर पंचक घेताच नॅथन लायनच्या नावे २ मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे. तो बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत १०० गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तसेच तो या ट्रॉफीतील तिसरा गोलंदाज ठरला आहे.

या यादीत भारतीय संघाचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहेत. त्यांनी १९९६ पासून ते २००८ पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना २० सामन्यांमध्ये १११ गडी बाद केले होते. तर आर अश्विनने देखील २० सामन्यांमध्ये १०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे.

भारतीय संघाविरुद्ध असा कारनामा करणारा पहिलाच गोलंदाज..

नॅथन लायनने भारतीय संघाविरुद्ध खेळताना आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक वेळेस पंचक घेण्याचा विक्रम हा नॅथन लायनच्या नावे नोंदवला गेला आहे.

आतापर्यंत नॅथन लायनने ८ वेळेस हा कारनामा केला आहे. यापूर्वी हा विक्रम दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावे होता. मुरलीधरनने ७ वेळेस हा कारनामा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: या सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो करुन व्हा फेस्टिव्हलसाठी तयार, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग आणि सोफ्ट

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Maharashtra Live News Update : नारायणपूरच्या पोलीस अधीक्षकांसमोर १६ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

Shweta Tiwari: वयाची चाळीशी ओलांडली तरी दिसतेय चिरतरुण; श्वेता तिवारीचं फिटनेस रुटीन काय?

SCROLL FOR NEXT