gautam gambhir with hardik pandya twitter
क्रीडा

Gautam Gambhir: गौतम गंभीर हेड कोच बनताच नताशाने दिलेली रिॲक्शन व्हायरल, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मु्ख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांची रिप्लेसमेंट म्हणून गौतम गंभीरची भारतीय संघाच एन्ट्री झाली आहे. इथून पुढे गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार असल्याची माहिती जय शहा यांनी दिली आहे. मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागताच गंभीरवर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान त्याची गंभीरची पत्ती नताशाने लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौतम गंभीरला ही मोठी जबाबदारी मिळतात त्याची पत्नी नताशा जैनने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिने,' कारण,तो भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी दावेदार आहे.' असं लिहिलंय.

तर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी मिळताच गंभीरनेही आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, ' भारत माझी ओळख आहे आणि भारत देशाची सेवा करणं हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे सौभाग्य आहे. पुन्हा भारतीय संघात येऊन मला सन्मानित वाटत आहे. माझं लक्ष्य तेच राहणार आहे,जे आधीही होतं. निळ्या जर्सीतील खेळाडूंवर १.४ अब्ज भारतीयांची स्वप्न आहेत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्वकाही करेल.'

गौतम गंभीर हा २००७ टी-२० वर्ल्डकप आणि २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील विजयाचा हिरो आहे. भारतीय संघाने या दोन्ही स्पर्धेतील फायनलमध्ये विजय मिळवला होता. या विजयात गंभीरचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये ७५ धावांची खेळी केली होती. तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने ९७ धावांची खेळी केली. यावेळी त्याच्यावर हेड कोच म्हणून भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकून देण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AFG vs SA,1st ODI: अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच हरवलं

Depression Symptoms: डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणे कोणती? जाणून घ्या कसे ओळखाल?

Ladaki Bahin Yojana: जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, 'लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार, सकल मराठा समाजाचा इशारा

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT