jay shah and gerhard erasmus google
Sports

Team India News: कहरच केला...! भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेची घोषणा होताच नामिबियाच्या कर्णधाराची BCCI कडे खास मागणी

India vs South T20I Series Announcement: बीसीसीआयने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेची घोषणा केली आहे. दरम्यान नामिबियाच्या कर्णधाराने BCCI कडे खास मागणी केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट नियामत मंडळ (बीसीसीआयने) भारतीय संघाचं २०२४ वर्षातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंड आणि बांगलादेशचा सामना करताना दिसून येणार आहे. यादरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेने भारत-दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेची पोस्ट शेअर करताच नामिबियाच्या कर्णधाराने बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे.

भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने ८,१०,१३ आणि १५ नोव्हेंबर रोजी खेळले जाणार आहेत. या मालिकेची घोषणा होताच नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने पोस्ट शेअर करत अजब गजब मागणी केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेरहार्ड इरास्मसने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका सुरु होण्यापूर्वी नामिबियाची राजधानी विंडहोकमध्ये सराव सामना खेळवण्याची मागणी केली आहे. त्याने पोस्ट शेअर करत,' BCCI, विंडहोकमध्ये सराव सामना?' असं लिहिलं आहे.

कामगिरीत सुधार व्हावा म्हणून, गेरहार्ड इरास्मसने गेल्या काही महिन्यांपासून आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांविरुद्ध सामना खेळण्याची मागणी केली होती. यासह ओमान संघाचा कर्णधार आकिब इलियास आणि स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंगटनने देखील अशीच भावना व्यक्त केली होती. नामिबियाला आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत नामिबियाला केवळ १ सामना जिंकता आला होता. त्यामुळे २०२६ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी नामिबियाला क्लालिफायरचे सामने खेळावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT