Nagpur News saam tv
Sports

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Woman Cricketer: नागपुरातील १७ वर्षीय क्रिकेटपटू अदिती चौकांडे हिने VCA टीममध्ये निवड न झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळाली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) टीममध्ये निवड न झाल्याच्या नैराश्यातून १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीये. अदिती चौकांडे असं मृत क्रिकेटपटूचं नाव असून ती मूळची अकोला जिल्ह्यातील होती. गेल्या दोन वर्षांपासून ती आईसोबत नागपुरातील लक्ष्मी नगर परिसरातील उमालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होती.

क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावण्याचं स्वप्न पाहणारी अदिती सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सराव करत होती. तिचा भाऊदेखील क्रिकेटपटू असल्याने कुटुंबात क्रिकेटची पार्श्वभूमी होती. अलीकडे झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) टीमच्या निवड प्रक्रियेत तिची निवड झाली नव्हती. प्राथमिक माहितीनुसार, याच कारणामुळे ती मानसिक तणावात होती.

घटनेची माहिती मिळताच बजाज नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. घराची झडती घेत असताना पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली. त्यामध्ये, "माझं सिलेक्शन होत नाही, त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे," असा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन चौहान यांनी सांगितलं, "अदिती ही मूळची अकोल्याची असून ती आईसोबत नागपुरात राहत होती. ती गेल्या दोन ते तीन वर्षांपासून क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत होती. VCA टीममध्ये तिची निवड झाली नव्हती. तिचा भाऊदेखील क्रिकेटपटू आहे. घरातून एक सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये निवड होत नसल्याने जीवन संपवत असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होईल."

या घटनेमुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जातेय. क्रिकेटमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवण्यासाठी दरवर्षी हजारो खेळाडू विविध निवड चाचण्यांमध्ये सहभागी होत असतात. मात्र, मर्यादित जागा आणि तीव्र स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना पहिल्याच प्रयत्नात यश मिळत नाही. अशा वेळी अपयश स्वीकारून नव्याने तयारी करण्याबरोबरच खेळाडूंना कुटुंबीय, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा भावनिक आधार मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अदितीच्या मृत्यूमुळे स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्रातील मानसिक ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

Ladki bahin Yojana : ऑगस्ट उजाडणार पण जुलैचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांबाबत अपडेट समोर

SCROLL FOR NEXT