murugan ashwin viral catch video  twitter
Sports

TNPL 2023: अश्विनने हवेत उडी मारत टिपला भन्नाट कॅच! VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही..

Murugan Ashwin Catch: या सामन्यात अश्विनने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Viral Catch Video: आयपीएल २०२३ स्पर्धा झाल्यानंतर आता तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. या स्पर्धेत देखील युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील आठव्या सामन्यात डींडीगुल ड्रॅगन्स आणि मदुराई पँथर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात आर अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या डींडीगुल ड्रॅगन्स संघाने दमदार कामगिरी करत ७ गडी राखुन विजय मिळवला आहे. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मदुराई संघाने प्रथम फलंदाजी करताना १२३ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करतांना डींडीगुल ड्रॅगन्स संघाने १४.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केले. या सामन्यात मुरुगन अश्विनने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Murugan ashwin catch video)

तर झाले असे की, डींडीगुल ड्रॅगन्स संघाची फलंदाजी सुरु असताना एस अरुण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर एस अरुणने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण चेंडू उंच हवेत गेला. चेंडू हवेत जाताच मुरुगन अश्विन चेंडूच्या मागे धावला.

चेंडू खाली येणार इतक्यात त्याला जाणवलं की,चेंडू आपल्यापासून दूर आहे. त्यावेळी त्याने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. हा झेल पाहून फलंदाज आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही विश्वास बसत नव्हता. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात मदुराई पँथर्स संघासाठी जे कौशिकने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर गोलंदाजी करताना गुरजपनीत सिंगने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर डींडीगुल ड्रॅगन्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, बाबा इंद्रजितने सर्वाधिक ७८ धावांचे योगदान दिले. त्याने या खेळीदरम्यान ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तर सुबोध बाठी आणि पी सरवन कुमारने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

तसेच या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत डींडीगुल ड्रॅगन्स संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. आर अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या डींडीगुल ड्रॅगन्स संघाने आपल्या पहिल्या सामन्यात त्रिची संघावर विजय मिळवला होता. तर आता दुसऱ्या सामन्यात डींडीगुल ड्रॅगन्स संघाने मदुराई पँथर्स संघावर विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

SCROLL FOR NEXT