MUMBAI CHAWL ATHLETES WIN 7 GOLD MEDALS IN SOUTH ASIAN BOX-LANGDI CHAMPIONSHIP saam tv
Sports

मुंबईच्या चाळीतील ७ खेळाडूंचा भूतानमध्ये कहर; दक्षिण आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिपमध्ये जिंकली सुवर्णपदकं

South Asian Box-Langdi Championship : मुंबईच्या चाळीतील सात युवा खेळाडूंनी भूतानमधील दक्षिण आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिपमध्ये सात सुवर्णपदके जिंकत भारताला विजेतेपद मिळवून दिले.

Bharat Jadhav

  • दक्षिण आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी

  • मुंबईच्या सात युवा खेळाडूंनी सात सुवर्णपदके जिंकली.

  • भूतानमधील दक्षिण आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिपमध्ये भारताने विजेतेपद पटकावले.

मर्यादित जागा, जीर्ण झालेली क्रीडा-साधने आणि आर्थिक अडचणी अशा परिस्थितीत सराव करणाऱ्या मुंबईतील सात युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. भूतानमधील आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिप स्पर्धेत सात सुवर्णपदके जिंकून भारताला विजेतेपद मिळवून दिली. चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत मजल मारणाऱ्या खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास पाहून अनेकजण थक्क झालेत. सुवर्ण कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंचं भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक करण्यात आलंय.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असतात. सरकारी योजना आणि पक्षाच्या उपक्रमांसह विविध सामाजिक विषयांवरही रविंद्र चव्हाण सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होत असतात. आज मुंबईतील चाळीत वाढलेल्या ७ मुलांच्या असामान्य तरीही तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या कर्तृत्वाची त्यांनी दखल घेतली.

मुंबईतील चाळीत आणि सामान्य कुटुंबांत वाढलेल्या या सात खेळाडूंनी मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि अपुऱ्या प्रशिक्षणावर मात करत भूतानमध्ये पार पडलेली दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप गाजवली. सातही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली.

विराज भिलारे, गौरव सोनावणे, ऋग्वेद राहुल मोहिते, प्रथमेश चव्हाण, श्री धाधम, प्रथमेश पगारे आणि ऋषभ इंगळे अशी या ७ विजेत्या खेळाडूंची नावे असून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, चाळीतील अरुंद जागा आणि सार्वजनिक मैदानांपासून आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपपर्यंतचा हा प्रवास त्यांच्या जिद्दीची आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी आहे. या सात चॅम्पियन्सच्या कर्तृत्वाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे कौतुक केले आहे.

चाळींमधील अरुंद गल्ल्यांपासून आंतरराष्ट्रीय मंचापर्यंतचा प्रवास

हे सर्व खेळाडू मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांमधून आले आहेत. सार्वजनिक मैदाने आणि अरुंद गल्ल्यांमध्ये सराव करून त्यांनी हे यश संपादन केले. प्रशिक्षणाच्या योग्य सुविधा आणि आर्थिक मदतीचा अभाव असूनही त्यांनी हार मानली नाही. कठोर परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर त्यांनी केवळ आपली स्वप्नेच साकार केली नाहीत, तर देशालाही गौरव मिळवून दिला.

हे ७ विजेते कोण आहेत?

भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये विराज भिलारे, गौरव सोनवणे, ऋग्वेद राहुल मोहिते, प्रथमेश चव्हाण, श्री धाधाम, प्रथमेश पगारे आणि ऋषभ इंगळे यांचा समावेश आहे. आपापल्या गटांत अव्वल स्थान पटकावून, या सातही खेळाडूंनी भारताला 'ओव्हरऑल चॅम्पियन' (सर्वसाधारण विजेते) बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय.

क्रीडा तज्ज्ञांच्या मते, या खेळाडूंचे यश अशा हजारो मुलांसाठी प्रेरणादायी ठरते, जी मुले मर्यादित संसाधने असूनही खेळाच्या माध्यमातून प्रगती करण्याची आकांक्षा बाळगतात. आर्थिक अडचणी, संसाधनांची कमतरता आणि प्रशिक्षणाच्या योग्य सुविधांचा अभाव असूनही, या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सणासुदीत साखर कडू, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ

Eng vs Pak Highlights : इंग्लंडनं पाकिस्तानला दिला ८ वर्षांनंतर जबरा झटका; एक डाव आणि १०३ धावांनी उडवला धुव्वा

कॅन्सरवर इलाज मिळाला, मॉडर्ना-मर्कची कॅन्सरवर नवीन लस

पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये राडा! काँग्रेस आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

फासावर जरी चढवलं तरी मी वंदे मातरम...; AIMIM नेते वारिस पठाण नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT