MI vs RR IPL match Result: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आयपीएलचा ४२ सामना अतितटीचा झाला. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईने सहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात यशस्वीची १२४ धावांची खेळी व्यर्थ ठरली. मुंबईने सामना जिंकून रोहितला अनोखं बर्थडे गिफ्ट दिलं आहे. (Latest Marathi News)
राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सचा फलंदाजांची सुरूवात खराब झाली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहितने ५ चेंडूत ३ धावा केल्या. संदीप शर्माने रोहितला त्रिफळाचित केले. रोहित बाद झाल्यानंतर कॅमरन ग्रीन आणि किशनने संघाची कमान सांभाळली.
मुंबईने पॉवरप्लेमध्ये ५७ धावांची खेळी खेळली. त्यानंतर मुंबईचा सलामीवीर ईशान किशन २३ चेंडूत २८ धावा करत माघारी परतला. ईशानने ग्रीनसोबत ६२ धावांची भागीदारी रचली. मुंबईची १० षटकात २ विकेट गमावून ९८ धावसंख्या झाली. पुढे कॅमरन ग्रीन २६ चेंडूत ४४ धावा करून माघारी परतला. आश्विनने त्याला झेलबाद केले. ग्रीनने ४ चौकार आणि २ षटकार लगावले.
पुढे सूर्यकुमार यादवने १३ व्या षटकात ३ चौकार आणि १ षटकार लगावला. सूर्यकुमारने आक्रमक खेळात सातत्य ठेवत २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या अर्धशतकात ७ चौकार आणि २ षटकारांचा सामावेश आहे.
मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि टिम डेव्हिडच्या वादळी खेळीमुळे तीन चेंडू राखून राजस्थानवर मात केली. सूर्यकुमारने ५५ धावा कुटल्या. मुंबईने हा सामना जिंकल्यानंतर गुणतालिकेत ८ व्या स्थानावर पोहोचली आहे.
यशस्वीची १२४ धावांची खेळी ठरली व्यर्थ
राजस्थान रॉयल्सची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. बटलर आणि यशस्वी जैसवालने पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार संजू सॅमसनने १० चेंडूत १४ धावा कुटल्या. देवदत्त २ धावा करून तंबूत परतला.
शिमरोन हेटमायरने ९ चेंडूत ८ धावा केल्या. ध्रुवने दोनच धावा कुटल्या. यशस्वीच्या व्यतिरिक्त राजस्थानचा कोणताही खेळाडू २० धावांच्या पुढे गेला नाही. यशस्वी शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने ६२ चेंडूत १२४ धावा कुटल्या. यशस्वीने १६ चौकार आणि ८ षटकार लगावले. यशस्वीच्या शतकी खेळीमुळे राजस्थानने २१२ धावा कुटल्या
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.