mumbai indians wanted to leave jasprit bumrah rohit sharma saved his career says parthiv patel  yandex
Sports

IPL 2024: रोहितमुळे वाचलं बुमराहचं करियर; मुंबईने केलं होतं बाहेर; माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Parthiv Patel Statement: मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आयपीएल स्पर्धेत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. या संघाने भारतीय क्रिकेटला हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू दिले आहेत.

Ankush Dhavre

Parthiv Patel On Rohit Sharma:

आयपीएलच्या नव्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा युवा क्रिकेटपटूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण ही स्पर्धा गाजवल्यानंतर काही खेळाडूंना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह.

मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आयपीएल स्पर्धेत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. या संघाने भारतीय क्रिकेटला हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू दिले आहेत. बुमराहला घडवण्यात मुंबई इंडियन्सचा मोलाचा वाटा राहीला आहे. मात्र २०१६ मध्ये मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा फुल प्लान केला होता. याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठा खुलासा केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने जिओ सिनेमावर बोलताना म्हटले की,' आयपीएल २०१५ मध्ये, बुमराह संघात नवीन होता. त्यावेळी त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला संघात कायम ठेवलं. त्यानंतर पुढील हंगामात तुम्ही पाहिलंच असेल त्याने काय केलं.' (Cricket news in marathi )

आयपीएल २०१६ स्पर्धेत बुमराहने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने या हंगामात गोलंदाजी करताना १५ गडी बाद केले होते. यादरम्यान त्याने ३ वेळेल ३-३ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. आयपीएल स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याने भारतीय संघासाठी पदार्पण केलं. सध्या तो भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत त्याने शानदार गोलंदाजी करत १९ गडी बाद केले होते. तो भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT