cameron-green saam tv news
Sports

Cameron Green: हार्दिक पंड्यासाठी गो 'ग्रीन'! मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू या संघाकडून खेळणार

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सर्वांना आश्चर्यचकीत आणि ऐतिहासिक ट्रेड करण्यात आला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

Cameron Green Traded To RCB:

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू कॅमेरुन ग्रीनला आपल्या संघात स्थान दिले होते. मुंबई इंडियन्सने ग्रीनसाठी सर्वात मोठी बोली लावली होती.

असं वाटलं होतं की, मुंबईने लॉन्ग टर्म प्लान म्हणून त्याला संघात घेतलं आहे. मात्र असं काहीच झालेलं नाही. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सर्वांना आश्चर्यचकीत आणि ऐतिहासिक ट्रेड करण्यात आला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसून येणार आहे.

हार्दिकसाठी ग्रीनला सोडलं..

मुंबई इंडियन्सने १५ कोटी खर्च करत हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं आहे. हार्दिकला संघात आणण्यासाठी मुंबईने १७.५ कोटी किंमत असलेल्या कॅमरुन ग्रीनला रिलीज केलं आहे. मुंबई इंडियन्सने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी म्हटंलय की, निरोप घेणं कधीच सोपं नसतं. पण जड अंतःकरणाने आम्ही, एमआय पलटन, कॅमेरुन ग्रीनने दिलेल्या सर्व आठवणींसाठी आभार मानतो. २०२४ चा लिलाव होण्यापूर्वी त्याला मुंबई इंडियन्स संघातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ट्रेड करण्यात आलं आहे. (Latest sports updates)

मुंबई इंडियन्सने कॅमेरुन ग्रीनच्या काही खास इंनिग्सची आठवण करुन दिली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात सलग २ अर्धशतके झळकावली होती.

यासह राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना त्याने २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली होती. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावत त्याने मुंबईला अंतिम फेरीत पोहचवलं होतं.

अशी आहे कारकिर्द..

आयपीएल २०२३ स्पर्धेत तो आपला पहिलाच हंगाम खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये ५०.२२ च्या सरासरीने आणि १६०.२८ च्या स्ट्राईक रेटने ४५२ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ अर्धशतके आणि १ शतकी खेळी केली. तर गोलंदाजी करताना त्याने ६ गडी देखील बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : देव दर्शनाहून येताना काळाचा घाला, पिकअपचा चेंदामेंदा, ८ भाविकांचा जागेवरच मृत्यू

Maharashtra Live News : साताऱ्यात मुबलक पेट्रोल-डीझेल, अफवांवर विश्वास ठेवू नका - देसाई

Pune : पुण्यात खळबळ! लाच घेताना प्रांताधिकारी शिंदे यांना बेड्या, लिपिकही जाळ्यात; नेमकं काय घडलं?

कामाची बातमी! अतिक्रमणं करून बांधलेली घरं नियमित होणार, पण...फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tehsildar arrested MP: केबीसीत ५० लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराला अटक; अडीच कोटींचा घपला, कारनामे ऐकून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT