mumbai indians press conference captain hardik pandya address before ipl 2024 big revealtion on rohit sharma  twitter
क्रीडा

Hardik Pandya Statement: कॅप्टन बनताच पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये पंड्याचा मोठा खुलासा; रोहितबाबत केलं मोठं वक्तव्य

Mumbai Indians Press Conference: आगामी हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. पहिल्याच पत्रकार परिषदेत त्याने रोहित शर्माबाबत मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya On Rohit Sharma:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २२ मार्चपासून चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हे हंगाम सुरु होण्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्या आणि हेड कोच मार्क बाऊचरने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

हार्दिक पंड्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तो म्हणाला की, 'कायरन पोलार्ड आणि लसिथ मलिंगासोबत काम करण्यासाठी मी उत्साहीत आहे. आतापर्यंत माझा प्रवास शानदार राहिला आहे.'

तसेच रोहित शर्माबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना तो म्हणाला की,'काही वेगळं नसेल. जेव्हा मला गरज पडेल, तो मला मदत करण्यासाठी असेल. या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना सर्वकाही मिळवलं आहे. यासह भारतीय संघाचा कर्णधार म्हणून देखील त्याने मला खूप मदत केली आहे.' (Cricket news in marathi)

या पत्रकार परीषदेत कर्णधार हार्दिक पंड्यासह मार्क बाऊचरने देखील सहभाग घेतला आहे. आगामी हंगामात श्रीलंकेचा नुआन तुसारा देखील खेळताना दिसून येणार आहे. मार्क बाऊचरने नुआर तुसाराबद्दल वक्तव्य केलं. तो म्हणाला की,'नुआन तुसाराची गोलंदाजी स्टाईल हुबेहूब लसिथ मलिंगासारखी आहे. नुआनसाठी लसिथ मलिंगा परफेक्ट कोच आहे.'

आगामी हंगामासाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ:

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, डेव्हिस ब्रेविस, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, रोमारिओ शेफर्ड, शम्स मुलानी, नेहल वधेरा, गेलार्ड कोएत्झी,नमन धीर, अनशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा , मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल , शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, नमन धीर, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियूष चावला, आकाश मधवाल जेसन बेहेरन्डॉफ, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT