Hardik Pandya Jasprit Bumrah Mumbai Indians  saam tv
Sports

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? 'हार्दिक सेना' पॉइंट टेबलमध्ये शेवटून पहिली, असं आहे सध्याचं समीकरण

Mumbai Indians playoffs scenario : मुंबई इंडियन्स आतापर्यंत पाचवेळा आयपीएल विजेता संघ ठरला आहे. पण पहिला सामना सोडला तर, नंतर विजयापासूनच दूरच आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे का? काय आहे समीकरण? अजूनही हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला संधी आहे का?

Nandkumar Joshi

पहिला सामना सोडला तर, नंतरच्या सर्व सामन्यांत पराभूत होणाऱ्या मुंबई इंडियन्स संघावर सध्या टीका होत आहे. हार्दिक पंड्यानं कर्णधारपद सोडून पुन्हा रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवावं, असे मुंबई इंडियन्सचे चाहते बोलू लागले आहेत. मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आतापर्यंत काही विशेष कामगिरी करू शकला नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या बाहेर गेला आहे का? सध्याच्या घडीला काय आणि कसं आहे समीकरण? असे कैक प्रश्न पडले आहेत.

पॉइंट टेबलमध्ये तळाला

हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सँटनरसारख्या आंतरराष्ट्रीय आणि तगड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांना प्रचंड आशा असतात. पण त्या तुलनेत संघाची कामगिरी होत नाही. पहिला सामना जिंकल्यानंतर यंदा मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये सहज एन्ट्री करेल, असं वाटलं होतं. पण नंतरची कामगिरी इतकी खराब झाली की संघ प्लेऑफच्या बाहेर पडेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घडीला हा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाला आहे. आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. त्यातील चार सामन्यांत पराभव झाला आहे. आता जवळपास प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे.

प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी काय करावं लागेल?

आतापर्यंतच्या आयपीएलचा अनुभव बघता दहा संघ असलेल्या या स्पर्धेत एखाद्या संघाला १६ गुण मिळाले तर, प्लेऑफमध्ये स्थान जवळपास निश्चित समजले जाते. म्हणजेच संघाला किमान आठ सामने जिंकावे लागतात. मुंबई इंडियन्सला अद्याप ९ सामने खेळायचे आहेत. म्हणजेच संघाने ९ पैकी सात सामने जिंकले तरीही प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते. यापुढील प्रत्येक सामन्यात मुंबई इंडियन्सला जिंकावे लागणार आहे.

...तर मुंबई इंडियन्स बाहेर

मुंबई इंडियन्सला ९ पैकी ७ किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकावे लागणार आहेत. सातपेक्षा कमी सामने जिंकले तर कदाचित संघाला आयपीएलमधून बाहेर पडावे लागेल. जर सहा सामने जिंकले तर १४ गुण होतील. याआधीही १४ गुणांसह संघ टॉप ४ मध्ये पोहोचला आहे. पण निश्चित स्थान नव्हते. कारण १४ गुण असतील तर नेट रनरेट महत्वाचा असतो. सध्या तरी मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट खूपच कमी आहे. त्यामुळे सातपेक्षा कमी सामने जिंकणे म्हणजे मुंबईचे बाहेर जाणे निश्चित असेल.

मुंबई इंडियन्सला काय करावं लागेल?

मुंबई इंडियन्सचा पुढील प्रवास अत्यंत कठीण होणार आहे. कारण पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे तगडे संघ मुंबई इंडियन्स समोरचा सर्वात मोठा अडथळा असणार आहे. हे दोन्ही संघ पॉइंट टेबलमध्ये टॉप ५ मध्ये आहेत. हे दोन्ही संघ फॉर्मात आहेत. त्यामुळे त्यांना सध्या तरी पराभूत करणं एखाद्या टीमसाठी मॅजिकच असणार आहे. सध्या मुंबई इंडियन्ससाठी पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांनी प्रत्येक सामना जिंकणे महत्वाचे आहे. कारण गुणतालिकेत चार-पाच ते आठ स्थानावर असलेले संघ पुढे जाणार नाहीत. पुढील दोन ते तीन सामने आणि त्यांचा निकाल मुंबई इंडियन्सचा पुढचा आयपीएल प्रवास ठरवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात भीषण आग; चारा व शेती साहित्य जळून खाक

Crime News: ऑनलाईन गेमिंगच्या नादात आयुष्य उद्ध्वस्त, गळफास घेत संपवलं आयुष्य; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

खळबळजनक! हायकोर्टाच्या वकिलाने हॉटेलच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

Namita Thapar: अभिमान आहे हिंदू असल्याचा...! नमाजचे फायदे सांगितल्यावर ट्रोल झालेल्या नमिता थापरचं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT