mumbai indians playing XI Prediction after suryakumar yadav comeback amd2000 yandex
Sports

Suryakumar Yadav Comeback: सूर्या प्लेइंग ११ मध्ये कोणाच्या जागी खेळणार? कशी असेल प्लेइंग ११?

Mumbai Indians Playing XI Prediction: दिल्लीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव परतला आहे. दरम्यान सूर्यकुमार यादवच्या कमबॅकनंतर कोणाचा पत्ता कट होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Mumbai Indians Playing XI After Suryakumar Yadav Comeback:

आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग ३ पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संघातील प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव संघासोबत जोडला गेला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येणार आहे.

सूर्या इन, कोण होणार आऊट?

सूर्यकुमार यादव मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसेल. सूर्यकुमार यादव आल्यानंतर काही खेळाडू आहेत ज्यांचा पत्ता कट होऊ शकतो. ज्यात नमन धीर, डेवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि अनुभवी खेळाडू पियूष चावलाचा समावेश आहे. या चारही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या चारही खेळाडूंना आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही.

मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११ बदलणार?

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला संघात स्थान दिले जाऊ शकते. यासह नुवान तुषारा आणि श्रेयस गोपाललाचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. या तिन्ही खेळाडूंना आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. (Cricket news in marathi)

सध्या मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेच्या गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. या संघाने ३ सामने खेळले असून तिन्ही सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्स संघाचे पुढील तिन्ही सामने होम ग्राऊंडवर होणार आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ कमबॅक करू शकतो.

सूर्यकुमार यादवच्या कमबॅकनंतर अशी असेल मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, टीम डेविड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT