Mumbai Indians Next Captain: Will Hardik Pandya Be Replaced? saam tv
Sports

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

MI Captaincy : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघरचनेत आणि नेतृत्वात बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेतय. कोणकोणत्या खेळाडूंची नावे कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत, हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • मुंबई इंडियन्सच्या आगामी आयपीएल हंगामातील नेतृत्वाबाबत चर्चा सुरू

  • हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.

  • महेला जयवर्धने यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे संघातील संभाव्य बदलांकडे लक्ष

आयपीएलच्या २० व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स (MI) संघात मोठ्या उलटफेर होत आहेत. एका दिवसापूर्वीच संघ्याचे फलंदाज प्रशिक्षक असलेले महेला जयवर्धन राजीनामा दिलाय. त्यात आता एमआय संघाच्या कर्णधारपदाबाबतची चर्चा रंगू लागलीय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाच्या अलीकडील कामगिरीनंतर आता या फ्रँचायझीने नवीन कर्णधाराचा शोध सुरू केलाय. एमआय नवीन पर्वाला सुरुवात करणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय.

मुंबईचा संघ कर्णधार का बदलणार?

२०२४ मध्ये हार्दिक पांड्याने रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळलीय. परंतु त्याचा तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये मुंबई गुणतालिकेत तळाला राहिली. २०२५ मध्ये संघ 'क्वालिफायर २' पर्यंत पोहोचला, तर २०२६ मध्ये संघ पुन्हा एकदा प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला होता. तीन हंगामांत संघ केवळ एकदाच प्लेऑफपर्यंत पोहोचू शकलाय.

याच कारणामुळे कर्णधारपद बदलण्यामागचे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातंय. हाती आलेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापनासमोर सध्या दोन मुख्य पर्याय आहेत. यातील पहिला, अनुभवी रोहित शर्मा असून त्यानने संघाला पाचवेळा चॅम्पियन बनवलंय. दुसरा पर्याय म्हणजे २४ वर्षीय फलंदाज तिलक वर्मा. वर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत.

रोहित शर्माकडे कर्णधार पद सोपवलं जाणार?

मुंबई इंडियन्सच्या गोटातला एका गटाच्या मतानुसार, संघाचे नेतृत्व पुन्हा एक-दोन वर्षांसाठी रोहित शर्माकडे सोपवले जावे. त्याचवेळी तिलक वर्माला उपकर्णधार बनवून भविष्यासाठी तयार केले जावे. रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपदे पटकावली आहेत. मोठ्या सामन्यांमध्ये येणारा दबाव हाताळण्याची त्याच्याकडे क्षमता अतुलनीय आहे. मात्र या योजनेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रोहितचे वय. कारण एप्रिल २०२७ मध्ये तो ४० वर्षांचा होणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या गोटात एक गट असा आहे, ज्यांना तिलक वर्माकडे कर्णधारपद देण्याची इच्छा आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये २४ वर्षांचा होणारा तिलककडे दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्याने केवळ आयपीएलमध्येच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वतःची योग्यता सिद्ध केलीय. आशिया कप आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसारख्या अत्यंत तणावपूर्ण सामन्यांमध्ये त्याने ज्या संयमी आणि शांत स्वभावाचे प्रदर्शन केलंय.

त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व देण्याची शक्यता आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून असलेला त्याचा देशांतर्गत अनुभवही हा त्याच्याकडील प्लस पाईंट आहे. समर्थकांच्या मते, रोहितकडे पुन्हा वळण्यापेक्षा भविष्याचा विचार करणे मुंबई इंडियन्ससाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.

सूर्यकुमार आणि बुमराह देखील शर्यतीत

रोहित आणि तिलक यांच्याव्यतिरिक्त, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे देखील प्रबळ दावेदार आहेत. सूर्यकुमारकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याचा अनुभव आहे, परंतु त्याचे वय ३६ वर्षे आहे. त्यामुळे त्यालाही कर्णधार पद मिळेल असं वाटत नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र, एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्यावरील कामाचा ताण आणि तंदुरुस्तीचे व्यवस्थापन ही फ्रँचायझीसाठी एक मोठी चिंतेची बाब ठरेल. मुंबई इंडियन्स अनुभवी खेळाडूंना पसंती देते की तरुण ऊर्जेवर विश्वास दाखवते, हे पाहणे रंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

Diwali 2026 : यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

SCROLL FOR NEXT