Mumbai Indians
Mumbai Indians saam tv
क्रीडा | IPL

पंधरा वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, मुंबई इंडियन्सच्या नावावर नवा विक्रम

नरेश शेंडे

मुंबई : आयपीएलमध्ये आतापर्यंत पाचवेळा विजेतेपदावर मोहोर लावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाच्या मोसमात पुरती दमछाक झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबई इंडियन्सने गेल्या काही हंगामात चमकदार प्रदर्शन केलं होतं. परंतु, यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या (IPL 2022) पर्वात प्रतीस्पर्धी संघाविरुद्ध नऊ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने नांगी टाकली. सोमवारी झालेल्या कोलकता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्सच्या लढतीत मुंबईचा संघ ११३ धावांवर गारद झाला.

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्यामुळं मुंबईच्या संघाची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.सोमवारी केकेआर विरुद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईचा ५२ धावांनी पराभव झाला. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत खालच्या स्थानी आहे.

मुंबई इंडियन्सचा खराब कामगिरीचा विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात खराब कामगिरी करण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सिजनमध्ये ९ वेळा पराभवाचा सामना करण्याची वेळ मुंबईवर पहिल्यांदाच आली आहे. याआधी २००९,२०१४ आणि २०१८ मध्ये झालेल्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा आठवेळा पराभव झाला होता. २०१२,२०१६ आणि २०२१ च्या सिजनमध्ये मुंबई इंडियन्सला सातवेळा पराभवाचा सामना करावा लागला होता.

असा झाला मुंबईचा पराभव ?

नाणेफेक हारल्यानंतर कोलकता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करुन २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या. नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यरने ४३-४३ धावांची खेळी केली. याशिवाय अजिंक्य रहाणे २५ आणि रिंकू सिंगने नाबाद २३ धावा केल्या. विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने चमकदार कामगिरी केली. बुमराने चार षटतकांत १० धावा देत ५ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरला. परंतु केकेआरच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं मुंबईचा संघ १७.३ षटकांमध्ये ११३ धावांवर गारद झाला. इशान किशने ५१ धावांची खेळी करत मुंबईच्या संघाचा बळ दिलं. परंतु, अवघ्या १४ धावांच्या आत मुंबई इंडियन्सचे सहा फलंदाज बाद झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT