MI Women won by 8 wickets  Twitter
क्रीडा

MI Vs DC : मुंबईच्या पोरी लै भारी! DC वर 8 विकेटने मात करत मिळवला सलग तिसरा विजय

Chandrakant Jagtap

Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women: महिला प्रीमियर लीगच्या सातव्या सामन्यात हरमनप्रीत कौरची टीम मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलला 8 विकेटने पराभूत करत मोठा विजय मिळवला. या विजयासोबतच मुंबई इंडियन्सने पॉईंट्स टेबलवर अव्वल कायम ठेवले आहे.

मुंबईतील डॉ. डाय पाटील स्पोर्ट्स ग्राउंड येथे या दोन्ही संघात ही रोमांचक लढत झाली. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय संघाला योग्य सिद्ध करता आला नाही. दिल्लीचा संपूर्ण संघ 18 षटकांत अवघ्या 105 धावा करून बाद झाला.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदनावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सने पहिल्या चेंडूपासून लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक खेळी केली. अवघ्या 8 षटकांत हरमनप्रीत कौरच्या संघाने एकही विकेट न गमवता 61 धावा केल्या. त्यानंतर यस्तिका भाटियाला 41 धावा करून बाद झाली, तर तिच्यापाठोपाठ हॅली मॅथ्यू देखील 32 धावां करून बाद झाली. मुंबईच्या दोन विकेट्स 75 च्या धावसंख्येवर पडल्या. त्यानंतर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी संघाला विजयापर्यंत पोहोचवले. (Latest Sports News)

मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा विजय आहे. या मोठ्या विजयानंतर मुंबई संघ 6 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. दुसरीकडे दिल्लीने देखील आधीचे दोन सामने जिंकले होते, परंतु या तिसऱ्या सामन्यात त्यांना मुंबईकडून पराभव स्विकारावा लागला. यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ चार गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. (Cricket News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT