mumbai indians yandex
Sports

Mumbai Indians Retain Players: हार्दिक पंड्याची सुट्टी! मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिटेन करणार?

Mumbai Indians, IPL 2025 Mega Auctions: आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. दरम्यान या हंगामात मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करु शकते? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर आयपीएल संघमालक आणि बीसीसी आयचे अधिकारी यांच्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान या मेगा ऑक्शनबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

मुंबई इंडियन्स संघात होणार मोठे बदल?

माध्यमातील वृत्तानुसार, आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. मुंबई इंडियन्स आपला कर्णधार हार्दिक पंड्याला आगामी हंगामात रिलीझ करू शकते. गेल्या हंगामात मोठी रक्कम मोजून हार्दिकला संघात स्थान दिलं गेलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून ही जबाबदारी हार्दिककडे सोपवली गेली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, हार्दिक पंड्याला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

या ४ खेळाडूंना रिटेन करणार मुंबई इंडियन्स?

आयपीएल स्पर्धेच्या नियमानुसार दर ३ वर्षांनी मेगा ऑक्शन होतं. आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे. आतापर्यंत जे नियम आहेत, त्यानुसार प्रत्येक संघाला ४ खेळाडू रिटेन करण्याची अनुमती दिली गेली आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तात असा दावा केला गेला आहे की, यावेळी रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या वाढू शकते. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं जात आहे की, मुंबई इंडियन्स कुठल्याही परिस्थितीत रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवला सोडणार नाही.अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पंड्याला जाऊ देऊ शकतो. माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होऊ शकतो. कारण तो सध्या भारतीय टी -२० संघाचा कर्णधार आहे. यासह चौथा खेळाडू म्हणून तिलक वर्माचाही मुंबई इंडियन्स संघात समावेश केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT