मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गुरुवारी इतिहासाला गवसणी घातली आहे. एमसीएचे नाव GUINNESS WORLD RECORDS™ TITLE ‘क्रिकेट बॉल वापरून तयार केलेले सर्वात मोठे वाक्य’ रचल्याबद्दल नोंदवण्यात आले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचा एक भाग म्हणून हा विक्रम करण्यात आला.
वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा प्रवास सुरू झाला त्या दिवसाला खास आदरांजली वाहाण्यात आली. स्टेडियमवर १९७५ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला होता, ज्यात भारत आणि वेस्ट इंडीज यांचा समावेश होता. २३ ते २९ जानेवारीदरम्यान झालेल्या या अविस्मरणीय टेस्ट मॅचच्या वर्धापनदिनी हा विक्रम करण्यात आला.
एमसीएने हा विक्रम त्या सामन्यात शतक करणारे खेळाडू दिवंगत एकनाथ सोलकर आणि असामान्य कामगिरी करत या खेळासाठी भरीव योगदान देणाऱ्या इतर खेळाडूंना अर्पण केला.
गुणवत्तेप्रती एमसीएची अविरत बांधिलकी दर्शवण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर 14,505 लेदरचे क्रिकेट बॉल्स रचून ‘Fifty Years of Wankhede Stadium’ या वाक्याची निर्मिती करण्यात आली. हा विक्रम एमसीए अध्यक्ष श्री. अजिंक्य नाईक आणि ऑफिसमधील इतर अधिकारी तसेच अपेक्स कौन्सिल सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हा विक्रम करण्यासाठी वापरण्यात आलेले बॉल्स शाळा, क्लब्ज आणि शहरातील एनजीओजमधील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंना वाटले जाणार आहेत. या विक्रमातून त्यांनाही आपल्या करियरमध्ये दमदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळावी असा हेतू आहे.
‘मुंबई क्रिकेटने या खेळासाठी लक्षणीय योगदान दिले आहे आणि क्रिकेटच्या इतिहासात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. या शहराने जागतिक कीर्तीचे महान खेळाडू घडवले आहेत. वानखेडे स्टेडियम हा मुंबईचा अभिमान असून ते काही ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. हा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड मुंबई क्रिकेटची पॅशन आणि गुणवत्तेचा सातत्यपूर्ण ध्यास दर्शवणारा आहे. मुंबई क्रिकेटच्या वारशासाठी योगदान देणारे खेळाडू, अधिकारी आणि पडद्यामागच्या व्यक्तींना वाहिलेली ही आदरांजली आहे,’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अजिंक्य नाईक म्हणाले.
यापूर्वी एमसीएने स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात १९७४ मध्ये वानखेडे स्टेडियम पहिला, फर्स्ट क्लास सामना खेळलेल्या मुंबईच्या स्त्री आणि पुरुषांच्या टीमचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय पूर्वीची निवड व्यवस्थापन समिती आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ मुंबईच्या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. या असोसिएशनने आपल्या ग्राउंड्समनचा सत्कार केला, तसेच या पडद्यामागच्या हातांचा सन्मान करण्यासाठी पॉली उम्रीगर आरोग्य शिबिर व खास जेवणाचेही आयोजन केले.
१९ जानेवारी रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, डायना एडुलजी, रोहित शर्मा, अजिंक्य राहाणे उपस्थित होते. या अविस्मरणीय संध्याकाळी अजय- अतुल आणि अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रम झाला व त्यानंतर लेसर शोचे आयोजन करण्यात आले होते.
(किती बॉलचा वापर केला गेला?) Break-up of the balls used in creating each word –
• FIFTY - 1902
• YEARS - 2831
• OF - 1066
• WANKHEDE - 4990
• STADIUM – 3672
• FULL STOP (.) – 44
TOTAL – 14,505
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.