Prithvi Shaw, Aditya Shrivastva, Ranji Trophy 2022, Mumbai, Madhya Pradesh
Prithvi Shaw, Aditya Shrivastva, Ranji Trophy 2022, Mumbai, Madhya Pradesh saam tv
क्रीडा | IPL

Ranji Trophy Final : शाॅ, जयस्वाल जाेडीने केली मुंबईची धमाकेदार सुरुवात; मध्यप्रदेशचे गाेलंदाज ढेपाळले

Siddharth Latkar

बंगळूर (Ranji Trophy Latest Marathi News) : मुंबई (mumbai) आणि मध्य प्रदेश (madhya pradesh) यांच्यात आज (बुधवार) रणजी करंडक (ranji trophy 2022) क्रिकेट (cricket) स्पर्धेचा आज अंतिम सामना हाेत आहे. या सामन्याचा आजचा पहिला दिवस असून एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळविला जात असलेल्या या सामन्याचे नाणेफेक मुंबईने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Mumbai captain Prithvi Shaw Wins toss, opts to bat against Madhya Pradesh)

आजपर्यंत ही स्पर्धा मुंबईने 41 वेळा जिंकली आहे. 88 वर्षांच्या जुन्या इतिहासातील सर्वाधिक विजेतेपद मुंबईच्या नावावर आहे. दरम्यान, मध्य प्रदेशने 1998-99 हंगामात फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली हाेती आणि उपविजेतेपद पटकावले.

यंदाच्या हंगामात मुंबईने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशशी बरोबरी साधली आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्य प्रदेशने उपांत्य फेरीत बंगालचा १७४ धावांनी पराभव करत २३ वर्षांत पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे.

आज मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ही जाेडी सलामीस आली आहे. तर मध्यप्रदेशच्या कर्णधार आदित्य श्रीवास्तवने (Aditya Shrivastva) डावखू-या फिरकी गाेलंदाज कुमार कार्तिकेयनला पहिले षटक दिले. मुंबईच्या 19 षटकात बिनबाद 65 धावा झाल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: गुटख्याच्या पुडीने नाणेफेकचा सराव करावा! १० वेळा टॉस गमवणाऱ्या ऋतुराजची दिग्गज माजी क्रिकेटर घेतली फिरकी

Sharad Pawar Health News | शरद पवार यांची तब्येत बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द

Nashik Lok Sabha: शिंदे गटाची ताकद वाढली, ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT