CSK VS SRH IPL 2025 X
Sports

धोनी ६ वर बाद, तरुणी नाराज; आधी डोक्यावर मारला हात अन् जोडीदाराला.., मिस्ट्री गर्लचा Video Viral

CSK VS SRH IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यामध्ये नवी मिस्ट्री गर्ल दिसली. महेंद्रसिंह धोनी आउट झाल्यानंतर मिस्ट्री गर्लने दिलेल्या ॲक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

IPL 2025 मध्ये एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा अशा दिग्गज खेळाडूंसह कुणाची चर्चा झाली असेल तर ती म्हणजे स्टेडियममधील कॅमेरामॅन्सची..! सामना सुरु असताना काही कॅमेरामॅन खेळाडूंपेक्षा स्टेडियममधील लोकांवर त्यातही सुंदर मुलींवर फोकस करत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. चेन्नईच्या एका मॅचमध्ये एका मिस्ट्री गर्लची चर्चा झाली होती. धोनी आउट झाल्यानंतर या तरुणीने राग व्यक्त केला होता. अशाच एका नव्या व्हायरल तरुणीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना रंगला आहे. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने १९.५ ओव्हर्समध्ये १५४ धावा केल्या. आयुष म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी आक्रमक खेळी केली. त्यांना अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही.

शिवम दुबे कॅचआउट झाल्यानंतर कॅप्टन एमएस धोनी फलंदाजी करण्यासाठी आला. सहा विकेट्सनंतर धोनीने मोर्चा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नांमध्ये धोनी फक्त सहा धावांवर बाद झाला. हर्षल पटेलच्या ओव्हरमध्ये धोनीने शॉट मारला, चेंडू थेट अभिषेक शर्माच्या दिशेने गेला आणि अभिषेकने कॅच पकडली. धोनी बाद झाल्यानंतर एका फॅनने डोक्यावर हात मारुन घेतला आणि तिच्या पार्टनरला बुक्की मारली. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादने चांगला खेळ केला. हैदराबादच्या खेळाडूंनी चांगल्या कॅचेस सुद्धा घेतल्या. हर्षल पटेलने चार विकेट्स घेतल्या. कॅप्टन पॅट कमिन्स आणि जयदेव उनादकट यांनी प्रत्येकी २ विकेट्स; तर मोहम्मद शमी आणि कामिंडू मेंडिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेत चेन्नईच्या फलंदाजांची कंबर मोडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT