shubman gill wicket twitter
Sports

MS Dhoni Stumping: क्यूं हिला डाला ना... फॉर्मात असलेल्या गिलला बाद करण्यासाठी धोनीची वाऱ्याच्या वेगानं स्टंपिंग -VIDEO

Shubman Gill Wicket: प्रथम फलंदाजी करत असलेल्या गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

CSK VS GT,FINAL: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना रविवारी खेळला जाणार होता. मात्र पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

धोनीची स्टंपिंग अन् गिल बाद..

या मोठ्या सामन्यात शुभमन गिल आणि वृद्धिमान साहाने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पावरप्ले पर्यंत दोघांनी मिळून ६२ धावा जोडल्या होत्या. गिल चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसून येत होते. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. ३ धावांवर जीवदान मिळाल्यानंतर तो ३९ धावसंख्येवर बाद होऊन माघारी परतला आहे.

तर झाले असे की, शुभमन गिल ३९ धावसंख्येवर फलंदाजी करत असताना रवींद्र जडेजा ७ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील अंतिम चेंडू टप्पा पडून इतका फिरला की, जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या गिलला कळालाच नाही.

चेंडू आणि बॅटचा संपर्कच झाला नाही. दरम्यान यष्टीमागे असलेल्या एमएस धोनीने आपल्या अनुभवाचा वापर करत वाऱ्याच्या वेगाने स्टंपिंग केली आणि गिलला यष्टिचित करत माघारी धाडले. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज:

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा

गुजरात टायटन्स:

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'भाजप लोकांची घरं फोडून राजकारण करतं'- उद्धव ठाकरेंचा घणाघात

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

Paneer Cutlet Recipe: छोट्या भूकेसाठी १० मिनिटांत बनवा खंमग पनीर कटलेट

SCROLL FOR NEXT